|
|
अर्थ विभाग
जिल्हा परिषद जळगाव महाराष्ट्र जि. प. व पं. स. अधिनियम १९६१ व महाराष्ट्र जि.प. व
पं.स. लेखांसंहिता १९६८ मध्ये विहीत केल्या प्रमाणे तसेच शासनाने वेळोवेळी दिलेल्या
सुधारीत शासन निर्णयानुसार कर्तव्य व कामे. अर्थ विभागात
आस्थापना , अर्थसंकल्पीय अंदाज, बाह्य
लेखा, भ.नि.नि. शाखेमार्फत कार्यालयीन कामकाज करण्यात येते.
कर्तव्य व कामे १) जि. प.
च्या वतीने शासनाकडील सर्व निधी जिल्हानिधीत जमा करणे व या रकमांचे वितरण तथा
खर्चाचा हिशोब ठेवणे व हिशोबांचे संकलन करणे. २) जि. प. शी संबंधीत हिशोबांच्या व
इतर तत्सम बाबी यांच्या बाबतीत प्राथमिक तपासणी करणे व प्राथमिक लेखा परिक्षक
म्हणुन कामकाज करणे. ३) लेखा व अर्थसंकल्पीय अंदाज वित्तीय नियमांची अमंलबजावणी
करतांना वित्तीय सल्लागार व वित्त विभागाचा विभागाध्यक्ष म्हणुन कामकाज करणे. ४)
जि. प. च्या सर्व आर्थीक व्यवहारांच्या संबंधीत त्या-त्या वेळी अंमलात आलेल्या
नियमांचे व आदेशाचे पालन करण्याची जबाबदारी पार पाडणे. ५) जिल्हा परिषद भ.नि.नि.
संदर्भात हिशोब ठेवणे, पेन्शन गटविमा योजना इ. मान्यता देणे ६) जिल्हा परिषद मधील
लेका संवर्गातील कर्मचार्यांचे सेवा विषयक बाबी हाताळणे व अंतीम निर्णयास्तव सादर
करणे. ७) जिल्हा परिषद अर्थ संकल्प व शासकीय अर्थ संकल्पांबाबत अंमलबजावणी करणे.
तसेच आक्षेपार्ह बाबतीत संपुर्ण तपशील व अक्षेपांचा तपशील कारणे नमुद करुन
संक्षीप्त ज्ञापन तयार करुन मा.मु.का.अ. व मा.अध्यक्ष यांचे मार्फत स्थायी समितीकडे
निर्णयार्थ सादर करणे.
|
|
|