आरोग्य विभाग
आरोग्य समितीचे कामकाज -
आरोग्य विभागाअतंर्गत जिल्हा परिषद स्थरावरील आस्थापना पदांचा तपशिल - तालुका वैद्यकीय
अधिकारी , पी.एच.एन., सांख्यिकी सहाय्यक , आरोग्य पर्यवेक्षक , औषध निर्माता , अवैद्यकीय
पर्यवेक्षक, प्रयोग शाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेविका (स्त्री) , आरोग्य सहाय्यीका (स्त्री),
आरोग्य सेवक (पु), आरोग्य सहाय्यक ( पु.) , सफाई कामगार, अर्धवेळ स्त्री परिचर, तालुका
वैद्यकीय अधिकारी , वैद्यकीय अधिकारी यांचे कामकाजावर नियंत्रण ठेवणे.
जिल्ह्यातील ग्रामिण भागात आरोग्य सेवा पुरविणे. कार्यालयीन अधिकारी कर्मचारी वेतन
व भत्ते, बांधकाम, विविध आरोग्य विषयक योजना , आस्थापना विषयक बाबी इ. साठी अंदाजपत्रक
तयार करणे व प्राप्त अनुदानाचे वितरण करणे, आरोग्य कर्मचार्यांचे विविध सेवाविषयक
लाभ मंजुर करणे, अभिलेख कक्ष, औषधी भांडार, औषधी खरेदी व वितरण आरोग्यविषयक प्रशिक्षण.
विविध योजना : आरोग्य विभागा अंर्तगत राबविण्यात येणार्या योजना खालील
प्रमाणे असुन खालील योजनांचे जिल्हा परिषद स्थरांवरील कामकाज आरोग्यविभागा मार्फत केले
जाते.
१) ग्रामिण आरोग्य अभियान २) कुटुंब कल्याण व माता बाल संगोपन ३) शालेय आरोग्य तपासणी
४) साथरोग नियंत्रण ५) जन्म मृत्यु नोंदी ६) नवसंजिवनी योजना ७) किटकजन्य रोग नियंत्रण
८) कुष्ठ रोग दुरीकरण ९) क्षयरोग नियंत्रण १०) पल्सपोलीओ ११) लसीकरण