header image

 जि. प. विभाग
  कोविड-१९
 झिरो पेंडन्सी
 माहितीचा अधिकार
 नागरी सनद
 जि. प. योजना
 जि.प.सर्वसाधारण बदल्या
 महत्त्वपूर्ण व्यक्ति
 पदभरती व जाहिरात
 ई-निविदा व दरपत्रके
 सेवाजेष्ठता सूची
 कार्यालयीन दूरध्वनी
  विविध केंद्र

मुख्यपृष्ठ जिल्ह्याची माहिती प्रशासनिक रचना जि.प.समित्या ई-शासन पर्यटन स्थळे
पर्यटन:
 जळगाव या शहरास अजिंठ्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. जळगाव येथून जवळ कानळदे गावाच्या पायथ्याशी गिरणेच्या काठी भूगर्भात कोरलेले शिवमंदिर व चार खोल्यांच्या गुंफा प्रेक्षणीय आहेत. जिल्ह्यातील रावेर तालुक्यात सातपुडा पर्वतरांगेत पाल हे थंड हवेचे ठिकाण आहे. येथील वनोद्यान पर्यटकांचे आकर्षणकेंद्र आहे. येथील चोपडा तालुक्यात उपनदेव-सुपनदेव या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत. एरंडोल तालुक्यातील पद्मालय हे गणेशाचे प्राचीन जागृत स्थान आहे. उजव्या व डाव्या सोंडेचे एकत्रित गणपती फक्त याच देवस्थानात पाहावयास मिळतात. जिल्ह्यातील शेदुर्णी (ता. जामनेर.) येथे महाराष्ट्रातील एकमेव अशी त्रिविक्रमाची स्वयंभू मूर्ती आहे. या स्थानास प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते. चाळीसगाव येथील पाटणादेवी येथे देवीचे मंदिर आहे. या ठिकाणी प्राचीन काळातील गणित-तज्ज्ञ भास्कराचार्य यांनी आपला लीलावती ग्रंथ लिहिला असे म्हटले जाते. एरंडोल येथे पर्शियन भाषेतील शिलालेख सापडला असून, याच ठिकाणचा पांडववाडा प्रसिद्ध आहे. एरंडोल तालुक्यातीलच फरकांडा येथील झुलते मनोरे आश्र्चर्यकारक असून, पर्यटनाच्या दृष्टीने प्रसिद्ध आहेत. पारोळा येथील १७२७ मध्ये बांधलेला भुईकोट किल्ला प्रसिद्ध आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे हे माहेर होय. पारोळा येथील भुईकोट किल्ला चांगदेव हे ठिकाण योगीराज चांगदेव यांचे स्थान म्हणून ओळखले जाते. येथे श्री चांगदेव यांचे (दुर्मिळ) मंदिरही आहे. जिल्ह्यातील अंमळनेर येथे संत सखाराम महाराजांची समाधी व एक तत्त्वज्ञान मंदिर आहे. जळगाव जिल्ह्यातील अनेर धरणाचा परिसर निसर्गरम्य असून येथे वन्यजीव अभयारण्य घोषित करण्यात आले आहे. या अभयारण्याचा आनंद घेण्यासाठी अलीकडच्या काळात पर्यटक येथे गर्दी करतात. चाळीसगावच्या उत्तरेस सुमारे ३० कि.मी अंतरावर गिरणा नदीकाठी वसलेले बहाळ हे गाव ताम्र-पाषाणयुगीन अवशेषांसाठी प्रसिद्ध आहे.
 पूज्य सानेगुरुजी, बालकवी ठोमरे, माधव जूलिअन्, बहिणाबाई चौधरी, स्वामी कुवलयानंद हे या जिल्ह्याचे आधुनिक काळास देणे, तर सखाराम महाराज समाधीने व तत्त्वज्ञान मंदिराने महाराष्ट्राची पंढरी बनलेले अमळनेर, पर्शियन शिलालेख व पांडववाडा असलेले एकचक्रानगर म्हणजे हल्लीचे एरंडोल, यादवकालीन शिल्प असलेले पाटण, चांगदेव व पारोळे इ. गावे हे या जिल्ह्याचे सांस्कृतिक लेणे आहे. उनपदेव, सुनपदेव, नाझरदेव येथे उष्ण झरे व पाल-मनुदेवी ही निसर्गरमणीय स्थाने प्रवासी आकर्षणे आहेत. फैजपूर हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे पहिले ग्रामीण अधिवेशनस्थळ म्हणून अजरामर, तर वरखेडी बुद्रुक हे केवळ सामान्य जनांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध दिलेल्या असामान्य लढ्यासाठी स्मरणीय आहे.

मुख्यपृष्ठ आमचे विषयी संपर्क इतिहास स्थान आलेख छायाचित्र दालन अस्वीकृती
All Rights Reserved @ zpjalgaon.gov.in
Proper View - Screen Resolution must be 1024 x 786 in pixel size.