बंद

    कृषी विभाग

    विभाग प्रमुखाची संपर्क माहिती
    विभाग प्रमुखाचे नाव पद्मनाभ शिवाजी म्हस्के
    पदनाम कृषी विकास अधिकारी
    दुरध्वनी क्रमांक (0257) 222 3557
    ई मेल आय डी- adojalgaon[at]gmail[dot]com

    व्हिजन आणि मिशन

    कृषी विभाग जिल्हा परिषद जळगाव यांचे

    ध्येय

    निविष्ठा गुण नियंत्रण व विविध संलग्न कार्यक्रमांद्वारे तसेच डीबीटी द्वारे लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ तसेच माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदया यांच्या मार्गदर्शक मार्गदर्शनानुसार जि प योजनेमध्ये नाविन्यपूर्ण योजनांचा समावेश करून जमिनीची आणि पाणी साठ्याची गुणवत्ता तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक उन्नती साधून त्यांचा विविध प्रकारचा स्तर उंचावणे व देशाचे कृषी क्षेत्राचे एकूण उत्पादन क्षेत्रात गुणवत्ता व वाटा वाढवणे.

    दृष्टी

    आगामी काळात माननीय मुख्य कार्यकारी महोदया यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील जमिनीत पाणी आडवा पाणी जिरवा या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त प्रसार करून भूजल पातळी उंचावणे। कृषी विभागाच्या विविध योजनांचा व्यापक प्रसार करून शेतकऱ्यांच्या अंतिम घटकापर्यंत योजनांचा लाभ व मार्गदर्शन देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणणे।

    उद्दिष्टे व कार्ये

    कृषि विभागाच्या कामाचे विस्तृत स्वरुप

    • कृषि विकास, व अन्न्य धान्याचे नगदी पिकांचे उत्पादन वाढविणे
    • आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेती विकास करणे
    • तालुका स्तरावर कृषि अधिकारी, विस्तार अधिकारी (कृषि) नियुक्त करणे
    • जिल्हा परिषदेकडे कृषि विषयक योजना ग्रामसेवकामार्फत गावपातळीवर शेतकऱ्यांपर्यंत पोहचविणे
    • कृषि विभागाच्या योजनांची अंमलबजावणी करणे व कोरडवाहू तसेच बागायत क्षेत्रातील शेती उत्पादनात वाढ करणे
    • बियाणे, खते, किटकनाशके बाबत गुणवत्ता नियंत्रण विषयक कामकाज करणे
    • अल्पभूधारक, बहुभूधारक, अनु.जाती/जमाती, महिला शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर फवारणी स्प्रे पंप, सिंचनासाठी पाईप, इले. मोटार/ऑईल इंजीन, नांगर इत्यादी औजारे वाटप करणे
    • अनु.जाती व अनु. जमातीच्या शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदानावर विहीर, एचडीपीई पाईप इ. घटकांचा लाभ देणे
    • बायोगॅस सयंत्र बांधुन वापर करणाऱ्या सर्व पात्र लाभार्थींना केंद्र शासनाच्या अनुदानाचा लाभ देणे

    कृषी विभाग [पीडीएफ – ७०० केबी]