जिल्हा परिषद जळगाव

श्री मिलिंद लोणारी, आरोग्य विभाग यांना महाराष्ट्र शासनाकडून राज्यस्तरीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार जाहीर

आरोग्य विभाग अंतर्गत कार्यरत श्री मिलिंद लोणारी, आरोग्य सेवक (प्रभारी) प्रसिद्धी माध्यम अधिकारी यांना महाराष्ट्र शासनाकडून राज्यस्तरीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
२३ जानेवारी २०२३ रोजी मुंबई येथील रंगशारदा सभागृह येथे मा मुख्यमंत्री ना एकनाथजी शिंदे, आरोग्यमंत्री मा ना डॉ तानाजी सावंत यांचे हस्ते श्री मिलिंद लोणारी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
………………………

 

महाराष्ट्र शासनाकडून राज्यस्तरीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार प्राप्त
श्री मिलिंद मनोहर लोणारी यांची प्रथम नियुक्ती नंदुरबार जिल्ह्यात झाली त्यांनी आदिवासी भाग नवापूर, धडगाव, अक्कलकुवा, तसेच दळणवळणाची साधने नसलेली नर्मदा परिसर अंतर्गत नर्मदा किनारी डोंगराळ अति दुर्गम भागात येणारी गावांना आरोग्य सेवा बजावलेली आहे, सदर ठिकाणी आरोग्य विभाग अंतर्गत येणाऱ्या विविध योजना राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत कुटुंब नियोजन शासकीया करिता लाभार्थींचे मतपरिवर्तन आणि गर्भनिरोधक साधनांचा वापर इत्यादी बाबत आरोग्य शिक्षण समुपदेशन करणे , राष्ट्रीय हिवताप- हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रम, कुष्ठरोग नियंत्रण, अंधत्व नियंत्रण, थॅलेसेमिया, हिमोफिलिया, सिकलसेल कार्यक्रम, डेंग्यू चिकनगुनिया, माता बाल संगोपन कार्यक्रमांतर्गत खेडोपाडी नियमित लसीकरण कार्यक्रम रबाविणे, पल्स पोलिओ कार्यक्रम, मानव विकास कार्यक्रम, साथरोग कार्यक्रम इ. आरोग्य सेवा प्रा आ केंद्र स्तरावर उपकेंद्र स्तरावर उत्कृष्ट पद्धतीने दिली आहे. त्यानंतर जळगाव जिल्हा परिषद येथे बदली झाल्यानंतर आरोग्य विभागात विविध प्रकारची कार्यासनांतर्गत उत्कृष्ट कामकाज करून, त्यांच्याकडे असलेले अधिचे कामकाज सांभाळून अतिरिक्त स्वरूपात असलेले प्रसिद्धी कार्यासनांतर्गत सर्व राष्ट्रीय कार्यक्रमांचे प्रचार प्रसिद्धी, प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी प्रचार प्रसिद्धी, जागतिक दिनानिमित्त रॅली काढणे, प्रिंट मीडिया वृत्तपत्र, पोस्टर्स, भिंतीपत्रके, बॅनर्स, होर्डिंग, लीफलेट, हॅन्ड बिल, पॉम्पलेट्स, इत्यादी माध्यमे तसेच दृकश्राव्य माध्यमे रेडिओ, एफएम, व्हाट्सअप, फेसबुक, ट्विटर यासारख्या डिजिटल प्रसारमाध्यमांचा वापर करून आरोग्य विषयक विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करण्याचे कामकाज केले आहे. त्याचप्रमाणे कोविड काळामध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल राज्य आणि जिल्हास्तरावर सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गुणगौरव देखील झालेला आहे. गोवर रूबेला मोहिमेत प्रचार प्रसिद्धीचे उत्कृष्ट कामकाज केल्याबद्दल जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेमध्ये अभिनंदनचा ठराव झालेला आहे. जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य तपासणी शिबिराचे नियोजन करणे इत्यादी उल्लेखनीय कामगिरी त्यांनी केलेली आहे.

Previous महाराष्ट्र जिल्हा परिषद (जिल्हा सेवा) सेवा प्रवेशोत्तर परीक्षा २०२१ चा निकाल