श्री क्षेत्र पद्मालय
देशभरात प्रसिध्द असलेल्या गणपती मंदिरापैकी एक महाभारत कालीन श्री क्षेत्र पद्मालय गणपतीचे मंदिर. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल गावापासून केवळ अकरा किलोमीटर अंतरावर असलेले श्री क्षेत्र पद्मालय देशभरात प्रसिध्द आहे. मंदिराचा परिसर घनदाट जंगल, जवळ असलेल्या तलाव, तलावातील विविध प्रकारचे रंगबिरंगी कमळाचे फुल हे भाविकांना आकर्षीत करतात.
श्री गणेशाच्या साडेतीन पिठांपैकी एक हे श्री क्षेत्र आहे. पद्मालय मंदिर भारतातील अडीच गणपती पिठांमध्ये एक आहे. हे मंदिर अर्धा पीठ म्हणून सन्मानीत आहे. मंदिरामध्ये दोन स्वयंभू दोन गणेश मूर्ती आहेत. एकाच व्यासपीठावर उजव्या आणि डाव्या दोघी सोंडेची गणपती मुर्ती विराजीत असून, जगातील हे एकमेव असे मंदिर आहे.
मंदिराला महाभारताचा इतिहास
महाभारताच्या काळात पांडव अज्ञातवासेत असतांना या ठिकाणी तलावात आंघोळीसाठी येत असत अशी काल्पनिक अख्यायिका आहे. तसेच पांडवकाळात भिम व बकासुराचे युद्ध झाल्याची काल्पनिक कथा आहे. बकासुराचा वध केल्यानंतर भिमाला तहान लागल्याने त्याने आपल्या मुठीचा जोरदास प्रहार खडकावर केल्याने त्या ठिकाणी खोल खड्डा पडला; त्यास भिम कुंड म्हणून ओळखले जाते. भिम कुंड परिसरात आजही भाताचा कण असल्याच्या पांढऱ्या खुणा आढळून येतात. एरंडोल शहरात असलेल्या पांडववाड्यातून श्री क्षेत्र पद्मालय येथे जाण्यासाठी भुयारी मार्ग असल्याचे सांगितले जाते.
संपर्क तपशील
पत्ता: पद्मालय मंदिर, तालुका, एरंडोल, मुखपत, महाराष्ट्र

कसे पोहोचाल?
विमानाने
जवळचे विमानतळ जळगाव आणि औरंगाबाद येथे आहे.
रेल्वेने
जवळचे रेल्वे स्थानक जळगाव आणि धरणगाव आहेत.
रस्त्याने
जळगाव, एरंडोल आणि पारोळा येथून बसेस उपलब्ध आहेत.