जळगाव जिल्हा परिषदेअंतर्गत ८६ उमेदवारांना अनुकंपा तत्त्वावर गट ड संवर्गातील परिचर पदावर समुपदेशनाद्वारे नियुक्ती
दिनांक १२ सप्टेंबर २०२५, शुक्रवार रोजी जळगाव जिल्हा परिषदेअंतर्गत ८६ उमेदवारांना अनुकंपा तत्त्वावर गट ड संवर्गातील परिचर पदावर समुपदेशनाद्वारे नियुक्ती देण्यात आली.
=> जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली.
=> संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शक व सुबक पद्धतीने पार पाडण्यात आली.
=> उमेदवारांना समुपदेशनानंतर थेट नियुक्ती आदेश देण्यात आले.
=> जवळपास वर्षभरानंतर झालेल्या या भरतीमुळे उमेदवार व कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले.
=> जिल्हा परिषदेचा पारदर्शक, कार्यक्षम व लोकाभिमुख प्रशासनाचा आणखी एक उत्तम आदर्श!