विशेष –
केळ्यांचे आगर ही जळगाव जिल्ह्याची सर्वांत महत्त्वाची ओळख होय. उत्तर महाराष्ट्रातील (ज्याला खानदेश असे म्हटले जाते) हा एक वैशिष्ट्यपूर्ण जिल्हा होय. सातपुड्याच्या रांगेतील आदिवासींचे वास्तव्य; भारतातील प्रमुख नदी असणा-या् तापीचा जिल्ह्यातून जाणारा प्रवाह, मूलभूत सोयीसुविधा सशक्त करणारे रेल्वेचे जाळे आणि आधुनिक शेतीचे -सिंचनाचे यशस्वी प्रयोग… या जिल्ह्याची अशी अनेक वैशिष्ट्ये सांगाता येतील.
खानदेश म्हणून ओळखला जाणा-या् ह्या जिल्ह्याने सातवाहनांपासून, मराठे व त्यांनतर इंग्रजांपर्यंत अनेक राजवटी पाहिल्या. १९०६ मध्ये जेव्हा खानदेशाची विभागणी झाली तेव्हा हा पूर्व खानदेश सध्याचे जळगाव बनला. तदनंतर १९६० मध्ये महाराष्ट्र राज्याच्या निर्मिती बरोबर जळगाव राज्यात दाखल झाला.
भूगोल-
जळगाव जिल्हा महाराष्ट्राच्या उत्तरेकडील जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या उत्तरेला मध्य प्रदेश राज्य, पूर्वेला बुलढाणा, दक्षिणेला औरंगाबाद जिल्हा, नैऋत्येला नाशिक, पश्र्चिमेला धुळे जिल्हा – असे जिल्हे वसलेले आहेत. जळगाव जिल्ह्यातील शेतीची प्रगती ही तेथे उपलब्ध असणार्या जलसंपदेमुळेच होय. तापी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी असून ती मध्य प्रदेश राज्यात उगम पावते. ह्या नदीचे वैशिष्ट्य म्हणजे, ही नदी इतर नद्यांसारखी पश्चिम घाटातून बंगालच्या उपसागराला न मिळता, पश्चिमेकडे वाहत जाऊन अरबी समुद्रास मिळते. (ही नदी पश्र्चिमवाहिनी आहे.)
शेती विकासासाठी व पिण्याच्या पाण्याच्या वापरासाठी, जळगाव जिल्ह्याने, अनोखा असा नदीजोड प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली असून, पायलट (पथदर्शी) प्रकल्प म्हणून यशस्वीदेखील करून दाखविला आहे. जिल्ह्यातील हवामान विषम व कोरडे आहे. त्या-त्या काळात कहक थंडी व अतिउष्ण उन्हाळा असे हवामान या भागात असते. जिल्ह्याच्या उत्तर सीमेवर (मध्य प्रदेशास लागून) सांतपुडा पर्वतरांगा असून या भागात जंगलांचे प्रमाण जास्त आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था
क्र. | प्रशासनाचा प्रकार | संख्या | नावे |
१ | महानगरपालिका | १ | जळगाव. |
२ | नगरपालिका | १३ | भुसावळ, अमळनेर, चाळीसगांव, चोपडा, पाचोरा, फैजपूर, यावल, रावेर, सावदा, पारोळे, धरणगाव, एरंडोल,जामनेर,नशिराबाद. |
३ | जिल्हा परिषद | १ | जळगाव |
४ | पंचायत समित्या | १५ | चाळीसगांव, भडगाव, पारोळे, अमळनेर, चोपडा,एरंडोल, जळगाव, पाचोरा, जामनेर, भुसावळ,यावल, रावेर,एदलाबाद/ मुक्ताईनगर, बोदवड, धरणगाव. |
वैशिष्ट्य –
पूज्य सानेगुरुजी, बालकवी ठोमरे, माधव जूलिअन्, बहिणाबाई चौधरी, स्वामी कुवलयानंद हे या जिल्ह्याचे आधुनिक काळास देणे, तर सखाराम महाराज समाधीने व तत्त्वज्ञान मंदिराने महाराष्ट्राची पंढरी बनलेले अमळनेर, पर्शियन शिलालेख व पांडववाडा असलेले एकचक्रानगर म्हणजे हल्लीचे एरंडोल, यादवकालीन शिल्प असलेले पाटण, चांगदेव व पारोळे इ. गावे हे या जिल्ह्याचे सांस्कृतिक लेणे आहे. उनपदेव, सुनपदेव, नाझरदेव येथे उष्ण झरे व पाल-मनुदेवी ही निसर्गरमणीय स्थाने प्रवासी आकर्षणे आहेत. फैजपूर हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे पहिले ग्रामीण अधिवेशनस्थळ म्हणून अजरामर, तर वरखेडी बुद्रुक हे केवळ सामान्य जनांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध दिलेल्या असामान्य लढ्यासाठी स्मरणीय आहे.
सर्वसाधारण माहिती
जळगाव हा भारताच्या महाराष्ट्रातील उत्तर भागातील जिल्हा आहे. प्रशासकीय आसन हे जळगाव शहर आहे. त्याची उत्तरेला मध्य प्रदेश राज्याने आणि पूर्वेला बुलढाणा जिल्ह्यांनी, आग्नेयेस जालना, दक्षिणेस औरंगाबाद, नै ऋत्येस नाशिक आणि पश्चिमेस धुळे या जिल्ह्यांची सीमा आहे. जळगावला मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणतात.
सातपुडा पर्वतरांगांनी घेरलेला जळगांव जिल्हा! तापी नदीने वेढलेला जळगांव जिल्हा! शिक्षणाचा ’श’ देखील माहित नसतांना ग्रामीण धाटणीच्या कवितांनी जगभर प्रसिध्द झालेल्या बहिणाबाई चौधरींचा जळगांव जिल्हा! बालकवी ठोंबरेंचा जळगांव जिल्हा! जळगांव जिल्हा बहिणाबाई चैधरींमुळे देखील प्रकाशझोतात आला,त्यांच्या मृत्युपश्चात त्यांच्या मुलाने बहिणाबाई चैधरींच्या अहिराणी भाषेतील कविता प्रकाशीत केल्या आणि अवघेजन अवाक् झाले.
एका अशिक्षीत शेतकरी महिलेने जिवनाचे सार तिच्या कवितांमधुन व्यक्त केले आणि समाजाला विचार करायला भाग पाडले आज उत्तर महाराष्ट्र विद्यापिठ कवियत्री बहीणाबाई चैधरी उत्तर महाराष्ट्र विश्वविद्यालय म्हणुन ओळखले जाते यातच सर्व आले. इतके मोठे व्यक्तीमत्व त्याच्या मृत्युपश्चात नावारूपाला यावे हा केवढा दैवदुर्विला!
जळगांव जिल्हा महाराष्ट्र राज्यात उत्तर पश्चिमेकडे वसलेला जिल्हा असुन सातपुडा पर्वत रांगांनी वेढलेला आहे, याच्या दक्षिणेकडे जवळच जगप्रसिद्ध पर्वत रांगा आणि अजिंठा लेणी आहेत.
कापसाच्या उत्पादनाकरता येथील शेती उपयुक्त असुन चहा, सोने, डाळी, कापुस आणि केळींकरता प्रमुख बाजारपेठ म्हणुन जळगांव ची ओळख आहे.
तापी नदीचे विशाल पात्र डोळयांत मावत नाही, महाराष्ट्रातील इतर नद्यांचा उगम पश्चिम घाटांमघे होतो आणि त्या पुर्वेकडे बंगाल च्या खाडीपर्यंत वाहातात परंतु तापी पुर्वेकडुन पश्चिमेकडे वाहाते आणि पुढे अरबी समुद्राला जाउन मिळते.
जळगांव जिल्हयातील तालुके
जळगांव जिल्हयात एकुण 15 तालुके आहेत.
1. जळगांव | 9. एरंडोल |
2. अमळनेर | 10. जामनेर |
3. भडगांव | 11. मुक्ताईनगर |
4. भुसावळ | 12. पाचोरा |
5. बोदवड | 13. पारोळा |
6. चाळीसगांव | 14. रावेर |
7. चोपडा | 15. यावल |
8. धरणगांव |
वाहतूक
- राष्ट्रीय महामार्ग 161H (भारत) नांदुरा येथून राष्ट्रीय महामार्ग 161G (भारत)
• राष्ट्रीय महामार्ग 161G (भारत) पासून पातूर – बाळापूर – शेगाव – संग्रामपूर – जळगाव जामोद – खाकनार M.P.
• खांडवी – कुऱ्हा मार्गे मुक्ताईनगर रस्ता. राज्य महामार्ग 195 जळगाव जामोदला जोडतो
• MH SH 24 संग्रामपूर – तेल्हारा मार्गे
• नांदुरा – मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील बडनेरा विभाग हे जवळचे रेल्वे स्थानक आहे.
• औरंगाबाद विमानतळ २२३ K.M अंतरावर सर्वात जवळचे देशांतर्गत विमानतळ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर हे सर्वात जवळचे आंतरराष्ट्रीय विमानतळ ३२७ किमी अंतरावर आहे.
भौगोलिक
लोकसंख्या 42,29,917 क्षेत्रफळ 11,765 वर्ग कि.मी. साक्षरता 85ः1000 पुरूषांमागे 933 स्त्रिया राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 आणि 211 या शहरातुन गेले आहेत. या जिल्हयाला पुर्वी खान्देश म्हणुन ओळखल्या जायचे.
या जिल्हयातुन तापी नदी गेली असुन या नदीची एकुण लांबी 724 कि.मी. आहे यातील 208 कि.मी. महाराष्ट्रात आहे. या नदिच्या अनेक उपनद्या असुन या नदीचे पात्र फार मोठे आहे. याशिवागिरणा आणि वाघुर या देखील प्रमुख नद्या आहेत.
अहिराणी ही येथील प्राचीन आणि मुख्य भाषा असुन, मराठी, खानदेशी भाषा देखील येथे मोठया प्रमाणात बोलल्या जातात. मध्यप्रदेश लगतचा समुदाय हिंदी भाषेचा उपयोग करतो.
या जिल्हयात साधारण 700 मि.मी. पाउस पडत असुन उन्हाळयात तापमान 45 ते 48 डिग्री सेल्सीयस पर्यंत देखील पोहोचते, थंडीच्या काळात वातावरण सुखदायक असते.
केळी, गहु, बाजरी, लिंबु, भुईमुग, कापुस आणि उस ही येथील मुख्य पिकं आहेत.पारंपारीक यात्रांमधे कार्तिक महिन्यात राम राठोत्सवाची यात्रा, नवरात्रात महालक्ष्मीची यात्रा, मुक्ताईनगर पासुन 6 कि.मी. दुर चांगदेवाची यात्रा आणि मुक्ताईनगर येथील कोठळीत मुक्ताईची यात्रा पारंपारीक आणि उत्साहाने दरवर्षी साजरी होते.
जिल्ह्याचा इतिहास
21 ऑक्टोबर-1960 पूर्वी जळगांव जिल्हा, ज्याला पूर्व खानदेश जिल्हा म्हणूनही ओळखले जाते, पूर्वी “खानदेश” चा एक भाग होता. अबुल फजल (ग्लॅडविनच्या ऐनकबरी 1157) च्या मते, खानदेश हे नाव गुजरातच्या अहमद ने फारुकी राजांच्या दुसऱ्या मलिक नासीरला दिलेल्या “खान” उपाधीवरून आले आहे. काही स्त्रोतांनुसार, हे नाव महाभारताच्या खांडव जंगलातून आले आहे.
महाभारतमध्ये तोरणमाळ (नंदुरबार जिल्हा) चा शासक युवंशव पांडवांशी लढल्याचा उल्लेख आहे. नाशिक आणि अजिंठा येथील खडक मंदिरे आणि लेण्या पहिल्या तीन शतकांदरम्यान दर्शवतात AD, खानदेश बौद्ध धर्माचे संरक्षण करणाऱ्या शासकांच्या अधिपत्याखाली होते.
त्यानंतर सप्तवनानस, आंध्रभृत्यस, विरसेन (अहिर राजा), यवन राजवंश, चालुक्य, यादव आणि नंतर अलाउद्दीन खिलजी, मोहम्मद तुघलक, मलिक राजा मलिक नजीर, हैदराबादचा निजाम आणि त्यानंतर मराठ्यांनी या प्रदेशावर राज्य केले.
18 व्या शतकात, खान्देशला ब्रिटिश सैन्याने होळकर राजवटीने धुळेसह मुख्यालय म्हणून ताब्यात घेतले. मा.रोबर्ट गिल हे धुळे येथील मुख्यालय असलेल्या खानदेश जिल्ह्यातील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे पहिले अधिकारी होते. 1906 मध्ये जेव्हा खानदेशाचे विभाजन झाले, तेव्हा पूर्व खानदेश सध्याचे जळगाव बनले. 1956 मध्ये राज्यांच्या पुनर्रचनेसह, त्याचा समावेश मुंबई राज्यात करण्यात आला आणि 1960 मध्ये महाराष्ट्राच्या निर्मितीसह जळगाव हा राज्याचा जिल्हा बनला.
पारोळा तहसीलमध्ये झांसीच्या महान राणीच्या वडिलांचे मानले जाणारे किल्ल्याचे अवशेष आहेत. 1936 चे अखिल भारतीय काँग्रेस अधिवेशन यावल तहसीलच्या फैजपूर येथे आयोजित करण्यात आले होते. सध्याच्या काळात जळगावच्या प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी अहिराणी बोलीची ख्याती सात समुद्रात पसरवली. साने गुरुजींनी कामगार वर्गाला जागवले तर बालकवी ठोंबरे यांच्या कवितेने जिल्ह्यातील सामाजिक-सांस्कृतिक जीवन समृद्ध केले.
महाभारत आणि रामायण मध्ययुगीन कालखंडात काळाचे संदर्भ
- ३०० परगणे असलेल्या खान्देशची राजधानी होती बऱ्हाणपूर
- आताचा खान्देश इतिहासकालिन असीरगड
- गिरीपर्णाची झाली गिरणानदी
- खान्देश होती कापडांची बाजारपेठ
कापूस, केळी व सोने यासाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्याला अनेक ऐतिहासिक संदर्भ आहेत. रामायण आणि महाभारतकाळातील घटना आणि घडामोडी जळगाव जिल्ह्याशी संबधित आढळून आलेल्या आहेत. श्री क्षेत्र पद्मालय येथे भीमाने बकासूराचा वध केला होता. तर प्रभु रामाने बाण मारून उनपदेव व सुनपदेव हे गरम पाण्याचे झरे निर्माण केले. राजा दशरथाने श्रावण बाळाच्या हत्येचे परिमार्जन पूर्वीच्या एदलाबादजवळील पवित्र तलावात केल्याचे संदर्भ मिळून आले आहेत
आताचा खान्देश इतिहासकालिन असीरगड प्राचीन काळी हा प्रदेश निर्जन होता. असीरगडजवळ थोडी मानवी वसाहत होती. या वसाहतीचा संबध महाभारत महाकाव्यातील द्रोणाचा पुत्र अश्वत्थामा याच्याशी होता. महाभारत काळात तोरणमाळचा एक राजा पांडवांच्या बाजूने लढला असे म्हटले जाते. या महाकाव्यातील एकचक्रनगरी म्हणजे सध्याचे एरंडोल असे स्थानिक अभ्यासक सांगतात. भीमाने बकासुराचा वध पद्मालयजवळ केला होता. अबुल फजल ज्याला अदिलाबाद म्हणतो ते एदलाबाद ( आताचे मुक्ताईनगर) हे चांगले नगर होते. राजा दशरथाने श्रावण बाळाची हत्या करून जे महापातक केले होते. त्याचे परिमार्जन दशरथाने एदलाबादजवळील पवित्र तलावात केले. या तलावात बारमाही पाणी असून १६ व्या शतकापासून शेतीसाठी जलसिंचन करण्यात येते. ३०० परगणे असलेल्या खान्देशची राजधानी होती बऱ्हाणपूर इतिहासकार बर्निअरने लिहून ठेवल्यानुसार खान्देशात ३०० परगणे अस्तित्वात होते. बºहाणपूर ही खान्देशची राजधानी होती. खान्देशातील सुभ्याचा एकुण महसूल त्यावेळी १८ लाख ५५ हजार रुपये होता. मुघलकालिन हिंदुस्थानच्या नकाशामध्ये जळगाव व भुसावळचा उल्लेख नाही. मात्र अमळनेर, बहाळ, भडगाव, पाचोरा, शेंदुर्णी, लोहारा, एरंडोल, धरणगाव, अडावद, चोपडा, डांभूर्णी, नशिराबाद, यावल, सावदा, न्हावी, चांगदेव, वरणगाव, बोदवड, एदलाबाद, अंतुर्ली, रावेर, बहादरपूर, जामनेर, जामोद, जैनाबाद या गावांचा उल्लेख सापडतो. गिरीपर्णाची झाली गिरणानदी मालेगाव तालुक्यातील वजिरखेडे येथे उत्खननात सापडलेल्या दोन ताम्रपटांमध्ये गिरणा नदीचा उल्लेख गिरीपर्णा असा आढळतो. या ताम्रपटाचा लेखनकाल इ.स.९१५ मानला जातो. ताम्रपटवरील संस्कृत प्रशस्तीचा लेखक कवी राजेश्वर आहे. गिरीपर्णाचा अपभ्रंश होऊन नदीला गिरणा नाव पडले असावे. खान्देश होती कापडांची बाजारपेठ इ.स.१६५६ पासून १७१७ पर्यंत मुघल राजवटीत जबाबदारीची व मानाचे स्थान भूषविणारा व्हेनिसचा निकोलाव मनुची अनेक वेळा खान्देश भ्रमंतीवर आला. त्याने समक्ष पाहिलेल्या घटनांच्या आठवणी चार ग्रंथांच्या रुपाने लिहून ठेवल्या. बºहाणपूरला उत्तम कापड, महिलांचे दुपट्टे व बुरखे तयार होत असल्याने पर्शियन व आर्मेनियन व्यापारी वारंवार खरेदीसाठी येत होते. याठिकाणी पांढरे व रंगीत तलम कापड आणि रंगीत छापील कापड तयार करण्यात येई. बरेच कापड पर्सिया, टर्की व अरबस्तानला निर्यात होत असल्याचे त्याने लिहून ठेवले आहे.