बंद

    जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा

     

    विभाग प्रमुखाची संपर्क माहिती
    विभाग प्रमुखाचे नाव श्री.राजू सुकदेव लोखंडे
    पदनाम प्रकल्प संचालक
    दुरध्वनी क्रमांक (0257) 2226592
    ई मेल आय डी- pddrdajal[at]yahoo[dot]com

    उद्दिष्टे व कार्ये

    जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागातील घरकुल विभागाचे अंतिम ध्येय हे आहे की, प्रत्येक गरजू ग्रामीण कुटुंबाला स्वतःचे पक्के घर उपलब्ध करून देणेआणि त्यांना सन्मानाचे व सुरक्षित जीवन जगण्यास मदत करणे. म्हणजेच‘सर्वांसाठी घरे’ (Housing for All)हे साध्य करणे हे आहे.

    महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान प्रभावीपण राबवून ग्रामीण भागातील दारिद्र्य निर्मूलन आणि गरीब कुटुंबांचे जीवनमान उंचावणे व ग्रामीण महिलांना संघटित करून त्यांना शाश्वत उपजीविकेची साधने उपलब्ध करून देणे हे आहे.

    व्हिजन आणि मिशन

    DRDA ही योजनांची अंमलबजावणी करणारी, समन्वय साधणारी आणि देखरेख ठेवणारी जिल्हा स्तरावरील प्रमुख संस्था आहे.

    महत्त्वाची कार्ये:

    नियोजन आणि व्यवस्थापन:दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रमांचे जिल्हा स्तरावर नियोजन करणे, लक्ष्य निश्चित करणे आणि आवश्यक संसाधनांची (Resource Mobilization) जुळवाजुळव करणे.

    देखरेख आणि मूल्यांकन (Monitoring and Evaluation):

    • राबवण्यात येत असलेल्या योजनांच्या प्रगतीवर नियमित देखरेख ठेवणे.
    • योजनेच्या गुणवत्तेची खात्री करणे आणि लाभार्थ्यांपर्यंत योग्य लाभ पोहोचत आहेत की नाही हे तपासणे.
    • योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटी दूर करण्यासाठी पंचायती राज संस्थांना मदत करणे.

    आर्थिक व्यवस्थापन:केंद्र व राज्य सरकारकडून प्राप्त झालेल्या निधीचे वाटप करणे आणि त्यांचा योग्य वापर होतो आहे की नाही, यावर नियंत्रण ठेवणे. सर्व खाती आणि नोंदी व्यवस्थित ठेवणे.

    जागरूकता आणि प्रशिक्षण:

    • ग्रामीण भागातील लोकांमध्ये सरकारी योजनांची आणि त्यांच्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण करणे.
    • योजनांच्या अंमलबजावणीत गुंतलेल्या अधिकाऱ्यांसाठी आणि लाभार्थ्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करणे.

    लाभार्थी निवड:दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांचे सर्वेक्षण करून, ग्रामसभेच्या माध्यमातून, योजनांसाठी पात्र लाभार्थ्यांची निवड प्रक्रियेत मदत करणे.

    पारदर्शकता:योजनांच्या अंमलबजावणीत संपूर्ण पारदर्शकता राखणे.

    सामान्य प्रशासन विभाग (अधिकारी / कर्मचारी ) कार्यालयीन रचना

    DRDA-Marathi1

    • पदांचा तपशिल:-

     

    अ.क्र. संवर्ग गट मंजुर भरलेली रिक्त
    1 प्रकल्प संचालक गट अ 01 01 0
    2 सहा.प्रकल्प संचालक गट ब 01 00 01
    3 कनिष्ठ प्रशासन अधिकारी गट क 01 01 00
    4 शाखा अभियंता गट क 01 01 00
    5 विस्तार अधिकारी (सां) गट क 01 00 01
    6 सहा.लेखाधिकारी गट क 01 01 00
    7 वरिष्ठ सहा गट क 01 01 00
    8 कनिष्ठ सहा गट क 01 01 00
    • संचालनालये / आयुक्तालये.
    • मा.संचालक,राज्य व्यवस्थापन कक्ष, ग्रामीण गृह निर्माण महाराष्ट्र राज्य, सिडको भवन, सी.बी.डी.बेलापूर , नवी मुंबई
    • मा.विभागीय आयुक्त, नाशिक विभाग,नाशिक.
    • मंत्रालय, ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
    • पुरस्कार
    • महाआवास अभियान सन 2020-21 सर्वोत्तम जिल्हा : प्रथम क्रमांक

    राज्यस्तरिय विशेष पुरस्कार – भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्धता.

    • महा आवास अभियान सन 2020-21

    विभाग स्तरीय पुरस्कार : सर्वोत्कृष्ठ जिल्हा

    प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण

    • महा आवास अभियान सन 2021-22

    राज्यस्तरीय पुरस्कार : सर्वोत्कृष्ठ जिल्हा – व्दितीय क्रमांक

    प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण

    • अमृत महा आवास अभियान पुरस्कार सन 2022-23

    राज्यपुरस्कृत आवास योजना – ग्रामीण

    विभागस्तरीय सर्वोत्कृष्ठ जिल्हा – ‍व्दितीय क्रमांक

    • कार्यक्रम
      1. मुक्ताई सरस
      2. दिशा समन्वय समिती पुरस्कार वितरण
    • उपक्रम
    • बहिणाबाई मार्ट