विभाग प्रमुखाचे नाव | श्री.सुनिल भु.पाटील |
पदनाम | कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग |
दुरध्वनी क्रमांक | (0257) 2229633 |
ई मेल आय डी- | eeworksdivjal@gmail.com |
व्हिजन आणि मिशन
व्हिजन (Vision)
“सुरक्षित, टिकाऊ, पर्यावरणपूरक आणि दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण करून ग्रामीण भागाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी योगदान देणे.”
मिशन (Mission)
-
दर्जेदार व वेळेत पूर्ण होणारी बांधकाम कामे करून ग्रामपंचायत व ग्रामीण भागाच्या विकासास गती देणे.
-
शाळा, रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य केंद्रे, कार्यालयीन इमारती आदी आवश्यक सार्वजनिक सुविधा गुणवत्तापूर्ण व शाश्वत पद्धतीने उपलब्ध करून देणे.
-
बांधकाम प्रक्रियेत पारदर्शकता, जबाबदारी आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करणे.
-
स्थानिक गरजेनुसार नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून खर्चिकदृष्ट्या फायदेशीर आणि पर्यावरणपूरक सुविधा उभारणे.
-
ग्रामस्थ व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सहभागातून पायाभूत सुविधांच्या देखभाल व व्यवस्थापनावर भर देणे.
उद्दिष्टे व कार्ये
जिल्हा परिषदेकडील बांधकाम विभाग हा विकास कामाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा विभाग आहे. या विभागाच्या अंतर्गत केंद्र शासन, राज्य शासन व जिल्हा परिषदे मार्फत देणेत येणाऱ्या अनुदानातून नवीन रस्ते तयार करणे, रस्त्यांची देखभाल दुरुस्ती करणे, इमारती अंतर्गत शाळा बांधकामे, शासकीय इमारती व निवासस्थाने इमारती बांधकामे, तालीम इमारती, समाज मंदिर, सार्वजनिक वाचनालय, बहुउद्देशिय सभागृह, प्राथमिक आरोग्य केंद्र इमारती व निवासस्थाने इत्यादी बांधकामांचा समावेश आहे.
जिल्हयातील एकुण 15 तालुक्यांसाठी जि.प.जळगांव मध्ये बांधकाम विभागाचे 1 विभाग व 8 उपविभाग कार्यरत आहेत.
बांधकाम विभागाच्या मुळ योजना खालील प्रमाणे
1] 3054 मार्ग व पुल (आदिवासी बिगर आदिवासी )
2] 3054 मार्ग व पुल रस्त्यंची देखभाल व दुरुस्ती
शासकीय इमारती देखभाल व दुरुस्ती इतर शासकीय विकास योजनंासाठी कार्यान्वयीन यंत्रणा म्हणुन विभाग काम पार पाडते या योजना खालील प्रमाणे
1) सार्वजनिक आरोग्य 2) पशुसंवर्धन 3) आमदार/खासदार निधि 4) गौण खनिज 5) ठक्कर बाप्पा योजना 6) मुलभुत सुविधा /नागरी
बांधकाम विभागांतर्गत एकूण रस्ते व लांबी
बांधकाम विभागाकडील कडील रस्ते व लांबी | ||||||
अ.नं. | पृष्ठभागा निहाय लांबी (कि.मी.) | एकुण लांबी (कि.मी.) | ||||
रस्त्याची वर्गवारी | डांबरी | खडीचा | अपृष्ठांकीत | अस्तित्वात नसलेली लांबी | ||
1 | इतर जिल्हा मार्ग (इजिमा) | 813.83 | 248.68 | 231.89 | 21.5 | 1315.9 |
2 | ग्रामीण मार्ग (ग्रा.मा.) | 1944.6 | 1859.7 | 2492.57 | 34.75 | 6331.6 |
एकुण | 2758.4 | 2108.4 | 2724.46 | 56.25 | 7647.5 |