- मुख्यपृष्ठ
- जिल्हाविषयी
- जिल्हा परिषद
- प्रतिनिधी व अधिकारी
- जि. प. विभाग
- सामान्य प्रशासन विभाग
- ग्रामपंचायत विभाग
- कृषी विभाग
- पशुसंवर्धन विभाग
- आरोग्य विभाग
- महिला व बालकल्याण विभाग
- बांधकाम विभाग
- ग्रामीण पाणी पुरवठा विभाग
- जिल्हा जलसंधारण विभाग
- प्राथमिक शिक्षण विभाग
- माध्यमिक शिक्षण विभाग
- जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन
- समाज कल्याण विभाग
- अर्थ विभाग
- जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा
- यांत्रिकी विभाग
- नागरी सेवा विषयक
- प्रसार प्रसिध्दी
- कार्यालयीन संपर्क
- इतर
- संपर्क
माहितीचा अधिकार
समग्र माहिती
अर्ज नमुने व कायदा
संबंधित परिपत्रके
जन माहिती व अपिलीय अधिकारी
समग्र माहिती
माहिती म्हणजे नक्की काय?
माहिती म्हणजे नोंदी, कागदपत्रे, शेरे, मेमो, ई-मेल्स, सल्ले, मते, प्रसिद्धीपत्रके, आदेश,परिपत्रके, रोजनिशी, करारनामा, अहवाल, कागद, उदाहरणे, नमुने या आणि अशा स्वरूपातील कोणतेही साहित्य तसेच ईलेक्ट्रॉनिक माध्यमात असलेली कोणत्याही स्वरूपाची खासगी माहिती, जी प्रचलित कायद्यातील तरतूदीनुसार सार्वजनिकप्राधिकरणास जाणुन घेण्याचा अधिकार आहे.
* मात्र यांत फाईलींवर मारलेल्या शेर्यांचा समावेश होत नाही.
माहितीचा अधिकार म्हणजे काय?
भारताच्या राज्यघटनेनुसार भारत हे लोकशाहीचे राज्य आहे. म्हणजेच, लोकांनीच लोकांकरिता उभे केलेले राज्य. स्वतंत्रप्राप्तीनंतरही अनेक दशेक उलटून गेली. परंतु, सद्यस्थितीत मतदानपलीकडे नागरिकांचा राज्य कारभारात फारसा सक्रिय सहभाग दिसून येत नाही. खरे तर भारतासारख्या लोकशाही राष्ट्रात प्रत्येक नागरिकांकडून राज्य आणि केंद्राच्या कारभारात आवर्जुन सहभाग घेतला पाहिजे. त्यासाठी नागरिकांना मूलभत हक्क राज्यघटनेने बहाल केले आहेत. म्हणजेच, नागरिकांना राज्याच्या किंवा केंद्राच्या कारभारात मत मांडण्यासाठी, शासनाची कार्यपद्धतीची माहिती, सार्वजनिक हिताच्या बाबी कश्याप्रकारे शासनाकडून हाताळलेल्या जातात हे जाणून घेण्याचा हक्क प्राप्त व्हावा म्हणून माहितीचा अधिकार अधिनियम २००५ हा कायदा अस्तित्वात आणण्यात आला
या अधिकारात खालील बाबींचा समावेश आहे:
• काम, कागदपत्रे, नोंदी यांची तपासणी करणे • कागदपत्रे किंवा नोंदी यांच्या प्रमाणित प्रती मिळवणे तसेच त्यांची टिपणे काढणे. • साहित्याच्या प्रमाणित प्रती मिळवणे • माहिती छापील प्रत (प्रिंटआऊटस्), सीडी, फ्लॉपी, टेप्स, व्हिडिओ रेकॉर्डस् किंवा इतर कोणत्याही ईलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे मिळवणे.
या कायद्यात माहिती नेमकी कोणत्या स्वरुपाची घेता येते ?
माहितीचा अधिकार म्हणजे कोणत्याही कार्यालयाकडे असलेली किंवा त्यांच्या नियंत्रणात असलेली व या नियमानुसार मिळवता येण्याजोगी माहिती ! माहिती जाणून घेणे, आवश्यक कागदपत्रे मिळवणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क असून तो मूलभूत अधिकार आहे. असा हा अधिकार २००५ या वर्षामध्ये सर्वांनाच मिळाला आहे. या अधिकाराचा वापर करुन परिसरात सुरु असलेल्या कामांची माहिती घेता येते. उदा. कार्यालयाचे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक, कार्यालयाची वेळ, जनमाहिती अधिकार्यांची नावे, कार्यालयाची कामकाजाची पद्धत, उद्दिष्टे, कार्यालयात उपलब्ध असलेली माहिती, विविध अर्जांचे नमुने, कर्मचार्यांची नावे व इतर माहिती, उपलब्ध निधी, लाभार्थ्यांची यादी, योजनांची माहिती, योजनांवर अथवा लाभार्थ्यांवर झालेला खर्च, परिपत्रके, उपलब्ध प्रकाशने व त्याची किंमत, कर्मचार्यांचे वेतन, अंदाजपत्रक अशा प्रकारची माहिती घेता येते.
जन माहिती अधिकारी म्हणजे कोण?
हे अधिकारी सर्व प्रशासकीय खात्यांत किंवा कार्यालयांत सार्वजनिक अधिकार्यांद्वारे नेमण्यात आलेले असतात. ते नागरीकांना त्यांनी मागितलेल्या माहितीनुसार माहिती देण्याचे काम करतात. या कामासाठी जर ते सहाय्यकाची मदत घेत असतील तर अशा व्यक्तीसही जन माहिती अधिकारी म्हणुन वागवले जाते.
कोणा कडून माहिती घेता येणार नाही ?
राष्ट्राच्या संरक्षणाच्या दॄष्टीने संवेदनाशील क्षेत्र, व्यक्तीगत स्वरुपाची, खाजगी कंपनी, विनाअनूदानीत संस्था,खाजगी विद्यूत पुरवठादार कंपनी इ. कडून या कायद्याच्या आधारे माहिती मागता येत नाही.
1 ज्यामुळे भारताची सार्वभौमता आणि एकात्मता, सुरक्षा,वैज्ञानिक किंवा आर्थिक बाबी,परराष्ट्रीय संबंध आदींना धोका पोहोचणार असेल किंवा ज्यामुळे एखाद्या गुन्ह्याला प्रोत्साहन मिळू शकते अशी कोणतीही माहिती.
2 कोणत्याही न्यायालयाने जी माहिती प्रसिद्ध करण्यास नकार दिला आहे किंवा जी माहिती दिल्याने न्यायालयाचा अवमान होईल अशी कोणतीही माहिती.
3 जी माहिती उघड केल्याने संसद किंवा विधीमंडळाच्या स्वातंत्र्याला बाधा येईल अशी माहिती.
4 व्यावसायिक गोपनीयता,व्यापारी गुपिते किंवा बुद्धीजीवी मालमत्ता यांचा समावेश,असणारी माहिती जी उघड केल्याने तिसर्या पक्षाच्या स्पर्धात्मक स्थानाला धक्का पोहोचू शकतो. अर्थात सदर माहिती उघड करण्यास प्रतिस्पर्धी पक्षाची हरकत नसल्यास ही माहिती उघड केली जाऊ शकते.
5 एखाद्या व्यक्तीच्या विश्वसनीय नात्यांमधुन मिळालेली माहिती. मात्र माहिती उघड करण्यास प्रतिस्पर्धी पक्षाची हरकत नसल्यास ही माहिती उघड केली जाऊ शकते.
6 परराष्ट्र सरकारकडून मिळवलेली माहिती. जी माहिती उघड केल्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो अथवा ज्यामुळे एखाद्या कायद्याची अंमलबजावणी करण्यास गुप्तपणे मदत करणार्या व्यक्तीवे नाव उघड होऊ शकते किंवा सुरक्षेच्या कारणांस्तव असलेली माहिती.
7 ज्यामुळे शोधकार्यात किंवा आरोपींवरील कारवाईत अडथळा निर्माण होऊ शकतो अशी माहिती.
8 मंत्रीमंडळ,सचिव आणि इतर अधिकारी यांच्यात होणार्या चर्चेचे तपशील व इतर कॅबिनेट कागदपत्रे.
9 जिचा सामाजिक कार्याशी अथवा जनहिताशी काहीही संबंध नाही अशी वैयक्तीक माहिती किंवा जी उघड केल्याने एखाद्या व्यक्तीच्या एकांताचा भंग होऊ शकतो किंवा त्याच्या खाजगी आयुष्यावर आक्रमण होऊ शकते अशी कोणतीही माहिती.
10 मात्र एखाद्या घटनेत व्यक्तीला अथवा पक्षाला होणारा त्रास जनहिताच्या तुलनेत कमी महत्त्वाचा असेल तर अशी माहिती उघड केली जाऊ शकते.
अर्ज कसा करावा?
माहितीचा अधिकार अर्ज कसा करावा?? माहितीसाठीचा अर्ज RTI application तुम्ही टपालने, ऑनलाईन किंवा वैयक्तिक कार्यालयात जाऊन करु शकता.माहिती मिळवण्यासाठी अर्जपद्धती: १. ऑफलाईन पद्धत (Offline) आणि २. ऑनलाइन पद्धत (Online)
जनमाहिती अधिकार्याकडे इंग्लिश, हिंदी किंवा त्या राज्याच्या अधिकृत भाषेत लेखी किंवा ईलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे आपल्या हव्या असलेल्या माहितीचा तपशील असणारा अर्ज सादर करावा • माहिती मिळवण्या मागील कारण स्पष्ट करणे अर्जदारावर बंधनकारक नाही. • ठरवून दिलेली फी भरावी.
१. माहिती कश्यासाठी हवी आहे हे नमूद करण्याची आवश्यकता नाही.२. अर्ज दाखल केल्यापासून माहिती ३० दिवसाच्या आत देणं बंधनकारक असतं.३. आवश्यक असलेली माहिती एखाद्याच्या जीवित रक्षणाच्या दृष्टीने किंवा मुक्ततेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या आपणास ती ४८ तासात तातडीने मागवता येऊ शकते.
४. माहितीच्या प्रत्येक पानासाठी २ रु. शुल्क आकारले जाते. शुल्काबद्दल तसे आपणास संबंधित विभागामार्फत अगोदर कळवले जाते. पण ३० दिवसानंतर माहिती दिली तर मोफत द्यावी लागते.५. जर ३० दिवसात आपलयाला माहिती मिळाली नाही किंवा अपुरी, दिशाभूल करणारी माहिती दिली तर त्याच कार्यालयातील प्रथम अपिलीय अधिकारी यांच्याकडे पहिले अपिल करू शकतो.६. पहिले अपिल केल्यानंतरही ३० दिवसात माहिती नाही मिळाली तर पुढील ९० दिवसात दुसरे अपील आयुक्तांकडे करता येते. माहिती अधिकाऱ्याला कोणती शिक्षा होऊ शकते?माहिती अधिकाऱ्याने कोणत्याही योग्य कारणाशिवाय अर्ज स्वीकारण्यास नकार दिला, ठराविक वेळेस माहिती दिली नाही. माहितीची विनंती दृष्ट हेतूने नाकारली, किंवा जाणूनबुजून चुकीची, अपूर्ण किंवा दिशाभूल करणारी माहिती दिली किंवा माहिती देण्यास अडथाळा आणला तर माहिती अधिकाऱ्याला प्रत्येक दिवसाला रु. २५० व जास्तीत जास्त रु. २५००० इतका दंड होईल. तसेच, शिस्तभंगाची कारवाई होईल
माहिती मिळवण्यासाठी काही खर्च येतो का ?
होय, माहितीसाठीच्या कागदपत्रांचा खर्च पुढील प्रमाणे येतो. मात्र अर्जदार दारिद्र्यरेषेखालील असेल तर- खर्च लागत नाही.
कागदपत्रांचा खर्च :- दस्तऐवजाचे वर्णन ——— खर्च
विविध कागदपत्रांची झेरॉक्स एका पानास रु. २
आवश्यक माहितीची सीडी किंवा फ्लॉपी प्रत्येकी ५० रु.
कार्यालयातील कागदपत्रे पहायची असल्यासपहिल्या तासासाठी खर्च नाही.
तासाभरापेक्षा अधिक वेळ पहायची असल्यास-प्रत्येक तासासाठी ५ रु.
आवश्यक माहिती पोस्टाने हवी असल्यास -पोस्टाचा खर्च द्यावा लागतो.
अर्जदार या फीचे पुर्नतपासणी करण्यासाठी योग्य त्या समितीकडे अपील करू शकतो.
• जर जनमाहिती अधिकारी ठरवून दिलेल्या वेळेत माहिती देण्यास अयशस्वी ठरल्यास त्याने ती माहिती अर्जदारास विनामुल्य देणे बंधनकारक आहे.
अर्जदाराने अपील कसे करावे?
१)अर्जदाराने मागितलेली माहिती अपूर्ण, चुकीची, दिशाभूल करणारी असेल किंवा माहिती नाकारल्यास संबंधित अर्जदारास जनमाहिती अधिकार्याविरुद्ध अपिलीय अधिकार्यांकडे अपील करता येते. हे अपील ३० दिवसांच्या आत करता येते. हा अपिलीय अधिकारी जनमाहिती अधिकार्यापेक्षा अधिक अनुभवी असणारा, कामाच्या सर्व बाबी माहिती असलेला असतो. त्याने अनुभवाचा व अधिकाराचा वापर नि:पक्षपातीपणे करावयाचा असतो. अपील असे करावे :
1) अपिलासाठी अर्ज सादर करताना कागदावर २० रुपयांचा न्यायालय मुद्रांक चिकटवावा.
2) अर्जावर नांव, पत्ता, जनमाहिती अधिकार्याचा तपशील द्यावा. त्यात कोणती अपेक्षित माहिती मिळाली नाही याचा उल्लेख करावा. एकूणच तक्रारीचे स्वरुप/अपिलाचे कारण स्पष्टपणे लिहावे.
3) शेवटी सही करुन अर्ज दाखल करावा. 4) अर्जाची पोच घ्यावी.
अपिलीय अधिकार्याकडे अपील दाखल केल्यावर अर्ज केल्याच्या दिनांकापासून ४५ दिवसांच्या आत माहिती मिळू शकते.
दुसरे अपील कसे करावे ?
अर्जदाराने मागितलेली माहिती अपिलीय अधिकार्याकडूनही न मिळाल्यास किंवा चुकीची, अर्धवट मिळाल्यास, समाधान न झाल्यास अर्जदार हा दुसरे अपील राज्य माहिती आयुक्तांकडे ९० दिवसाच्या आत करु शकतो. दुसरे अपील असे करावे :
1) अपिलासाठी अर्ज सादर करताना कागदावर २० रुपयांचा न्यायालय मुद्रांक चिकटवावा.
2) अर्जावर नांव, पत्ता, जनमाहिती अधिकार्याचा तपशील द्यावा. त्यात कोणती अपेक्षित माहिती मिळाली नाही याचा उल्लेख करावा. एकूणच तक्रारीचे स्वरुप/अपिलाचे कारण स्पष्टपणे लिहावे.
3) शेवटी सही करुन अर्ज दाखल करावा. 4) अर्जाची पोच घ्यावी.
अर्ज नमुने व कायदा
संबंधित परिपत्रके
Tab Content
जन माहिती व अपिलीय अधिकारी
अ जिल्हा स्तर
अ. क्र | जिल्हा परिषद स्तरावरील व पंचाययत समिती स्ततरावरील कार्यालयाचे नाव व पत्ते. | सहाय्यक माहिती अधिकारी | जन माहिती अधिकारी | प्रथम अपिलीय प्रधिकारी | ||
1 | 2 | 3 | 4 | 5 | ||
1 | सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषद जळगांव | संबंधित कनिष्ठ प्रशासन अधिकारी साप्रवि जि.प.जळगांव | सहा. प्रशासन अधिकारी | उप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जि.प.जळगांव | ||
2 | ग्रांम पंचायत विभाग जि.प.जळगांव | संबंधित व.सहा. / क.सहा. ग्राप. विभाग जि.प.जळगांव | क.प्रशासन अधिकारी (ग्राप) जि.प.जळगांव | उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप) जि.प. जि.प.जळगांव | ||
3 | बांधकाम विभाग जि.प.जळगांव | कनिष्ठ प्रशासन अधिकारी बांधकाम विभाग जि.प.जळगांव | उप कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जि.प.जळगांव | कार्यकारी अभियंता (बांधकाम विभाग) जि.प.जळगांव | ||
4 | जिल्हा जलसंधारण विभाग परिषद,जळगाव. | कनिष्ठ प्रशासन अधिकारी जिल्हा जलसंधारण विभाग परिषद,जळगाव. | सहायक जिल्हा जलसंधारण अधिकारी जिल्हा परिषद,जळगाव. | जिल्हा जलसंधारण अधिकारी जिल्हा परिषद,जळगाव. | ||
5 | ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि.प.जळगांव | सहा प्रशासन अधिकारी ग्रापापु विभाग जि.प.जळगांव | उप कार्यकारी अभियंता ग्रापापु विभाग जि.प.जळगांव | कार्यकारी अभियंता ग्रापापु विभाग जि.प.जळगांव | ||
6 | आरोग्य विभाग जि.प.जळगांव | कनिष्ठ प्रशासन अधिकारी (आरोग्य विभाग) जि.प.जळगांव | सहा.प्रशासन अधिकारी आरोग्य विभाग जि.प.जळगांव | जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प.जळगांव | ||
7 | पशुसंवर्धन विभाग जि.प.जळगांव | कनिष्ठ प्रशासन अधिकारी पशु संवर्धन विभाग जि.प.जळगांव | सहाय्यक प्रशासन अधिकारी पशु संवर्धन विभाग जि.प.जळगांव | जिल्हा पशुसवंवर्धन अधिकारी जि.प.जळगांव | ||
8 | समाज कल्याण विभाग जि.प.जळगांव | संबंधित वरि.सहा./ कनि.सहा (सकवि). जि.प.जळगांव | कनिष्ठ प्रशासन अधिकारी (सकवि)जि.प.जळगांव | जिल्हा समाज अधिकारी जि.प.जळगांव | ||
9 | अर्थ विभाग जि.प.जळगांव | संबंधित लेखाधिकारी अर्थ विभाग जि प जळगांव | उप मु.ले.वि.अधिकारी अर्थ विभाग जि.प.जळगांव | मुख्य लेखा व वित्त अधिकारी अर्थ विभाग जि प जळगांव | ||
10 | कृषि विभाग जि.प.जळगांव | कनिष्ठ प्रशासन अधिकारी अधिकारी , कृषी विभाग जि.प.जळगांव | सहा.प्रशासन अधिकारी (कृषी)जि.प.जळगांव | कृषी विकास अधिकारी जि.प.जळगांव | ||
11 | महिला ़व बाल कल्याण विभाग जि.प.जळगांव | कनिष्ठ प्रशासन अधिकारी (मबाकवि) जि.प.जळगांव | सहा.प्रशासन अधिकारी . (मबाकवि) जि.प.जळगांव | उप मुख्य कार्यकारी अधिकारी (मबाकवि) जि.प.जळगांव | ||
12 | जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जि.प. जळगांव | कनिष्ठ प्रशासन अधिकारी जि.ग्रा.वि.यं.जळगांव | सहा. प्रकल्प अधिकारी जि.ग्रा.वि यं.जळगांव | प्रकल्प संचालक जि.ग्रा.वि यं.जळगांव | ||
13 | शिक्षण विभाग (प्राथ)जि.प.जळगांव | सहा.प्रशासन अधिकारी शिक्षण विभाग जि.प.जळगांव | उप शिक्षणाधिकारी (प्राथ) जि.प.जळगांव | शिक्षणाधिकारी (प्राथ ) जि.प.जळगांव | ||
14 | शिक्षण विभाग (माध्य)जि.प.जळगांव | सहा.प्रशासन अधिकारी शिक्षण विभाग जि.प.जळगांव | उप शिक्षणाधिकारी (माध्य) जि.प.जळगांव | शिक्षणाधिकारी (माध्य) जि.प.जळगांव | ||
15 | सर्व शिक्षा अभियान जि.प.जळगांव | वरिष्ठ सहा./कनिष्ठ सहा. स.शि.अ.जि.प.जळगगांव | उप शिक्षणाधिकारी (प्राथ) जि.प.जळगांव | शिक्षणाधिकारी (प्राथ) जि.प.जळगांव | ||
16 | निरंतर शिक्षण विभाग जि.प.जळगांव | संबंधित वरि.सहा. /कनि.सहा (निरंतर ) जि.प.जळगांव | उप शिक्षणाधिकारी (निरंतर)जि.प.जळगांव | शिक्षणाधिकारी (निरंतर ) जि.प. जळगांव | ||
17 | पाणी स्वच्छता विभाग जि.प.जळगाव | संबंधित वरि.सहा./कनि.सहा पावस्व जि.प.जळगांव | कनिष्ठ प्रशासन अधिकारी पावस्व जि.प.जळगांव | उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पावस्व) जि.प.जळगांव | ||
18 | भुजल सर्व्हेक्षण व विकास यांजना विभाग जि.प.जळगांव | संबंधित वरि.सहा./ कनि.सहा (यांत्रिकी) जि.प.जळगांव | उप अभियंता (यांत्रिकी) जि.प.जळगांव | कार्यकारी अभियंता ग्रा.प.ापु वि.जि.प.जळगांव | ||
19 | राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान जि.प.जळगांव | जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक रा.प्रा.आ.अभि.जि.प.जळगांव | जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी रा.ग्रा.अभि.जि.प.जळगांव | जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प.जळगांव | ||
20 | महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना जि.प.जळगांव | संबंधित वरि.सहा./ कनि.सहा (मग्रारोहयो) जि.प.जळगांव | सहा. गटविकास अधिकारी (मग्रारोहयो) जि.प.जळगांव | उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप) जि.प.जळगांव | ||
ब तालूकास्तर | ||||||
अ. क्र | जिल्हा परिषद स्तरावरील व पंचाययत समिती स्ततरावरील कार्यालयाचे नाव व पत्ते. | सहाय्यक माहिती अधिकारी | जन माहिती अधिकारी | प्रथम अपिलीय प्रधिकारी | ||
21 | पंचायत समिती आस्थापना शाखा | सहा.प्रशासन अधिकारी पंचायत समिती | सहा गटविकास अधिकारी पं.ंस. | गटविकास अधिकारी पंचायत समिती | ||
22 | शिक्षण विभाग (प्राथ) | संबंधित वरि.सहा./ कनि.सहा (शिक्षण विभाग) पं.स. | विस्तार अधिकारी (शिक्षण) पं.स. | गट शिक्षणाधिकारी (शिक्षण विभाग) प.स. | ||
23 | ए.बा.वि.से.यो. प्रकल्प | संबंधित वरि.सहा./ कनि.सहा | संबंधित विस्तार अधिकारी (सांख्यि.)/व.सहा.(लेखा) | बाल विकास प्रकल्प ए.बा.वि.से.यो प्रकल्प | ||
24 | ग्रामपंचायत विभाग (प. स.) . | विस्तार अधिकारी (पंचायत) | सहा.गटविकास अधिकारी पं.स. | गटविकास अधिकारी पंचायत समिती | ||
25 | अर्थ विभाग | संबंधित वरिष्ठ सहा.(लेखा) प.स. | सहा.लेखाधिकारी प.स | गटविकास अधिकारी पंचायत समिती | ||
26 | कृषी विभाग प.स. सर्व | कृषी अधिकारी (कृषी) | सहा.गटविकास अधिकारी प.स. | गटविकास अधिकारी पंचायत समिती | ||
27 | जि.ग्रा.वि.यंत्रणेशी निगडीत कामकाज | संबंधित वरि.सहा./ कनि.सहा | कनि.लेखाधिकारी प.स. | गटविकास अधिकारी पंचायत समिती | ||
28 | समाजकल्याण विभाग प.स. | विस्तार अधिकारी (पंचायत/स.क.) | सहा.गटविकास अधिकारी प.स. | गटविकास अधिकारी पंचायत समिती | ||
29 | तालुका वैदयकिय अधिकारी | संबंधित कनिष्ठ सहाय्य्क | आरोग्य सहाय्यक | तालुका वैद्यकिय अधिकारी | ||
30 | पशुसंवर्धन विभाग प स | संबंधित पशु पर्यवेक्षक | पशुधन विकास अधिकारी | गटविकास अधिकारी पंचायत समिती | ||
31 | बांधकाम उपविभाग | संबंधित शाखा अभियंता (बांध) | उपअभियंता (बांधकाम) | कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जि.प.जळगांव. | ||
32 | लघुसिंचन उपविभाग | संबंधित शाखा अभियंता (लस्ंाविि) | उपअभियंता (लघुसिंचन) | कार्यकारी अभियंता लघुसिंचन विभाग जि.प.जळगांव | ||
33 | ग्रा.पा.पु.वि. उप विभाग | संबंधित शाखा अभियंता (ग्रापापुउवि) | उपअभियंता (ग्रापापुउवि) | कार्यकारी अभियंता ग्रा.पा.पु.वि.जि.प. जळगांव | ||
क – ग्रामीणस्तर | ||||||
अ. क्र | जिल्हा परिषद स्तरावरील व पंचाययत समिती स्ततरावरील कार्यालयाचे नाव व पत्ते. | सहाय्यक माहिती अधिकारी | जन माहिती अधिकारी | प्रथम अपिलीय प्रधिकारी | ||
34 | जि.प. प्राथमिक शाळा | संबंधित शाळेचे सेवाजेष्ठ शिक्षक/उपशिक्षक | संबंधित शाळेचे मुख्याध्यापक | गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती | ||
35 | ग्रामपंचायत | संबंधित ग्रामपंचायतीचे लिपीक | संबंधित ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक/ ग्राम विकास अधिकारी | सहायक गटविकास अधिकारी पंचायत समिती | ||
36 | तालुक्यातील प्रा.आ.केंद्र | संबंधित कनि.सहा. | प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी | तालुका आरोग्य अधिकारी | ||
37 | तालुक्यातील प्रा.आ.केंद्रातर्गत उपकेंद्र | आरोग्य सेवक/आरोग्य सहाय्यक | प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी | तालुका आरोग्य अधिकारी | ||
38 | पशु वैद्यकिय अधिकारी श्रेणी -1 | पशुधन पर्यवेक्षक | पशुधन विकास अधिकारी | गट विकास अधिकारी पंचायत समिती | ||
अ. क्र | जिल्हा परिषद स्तरावरील व पंचाययत समिती स्ततरावरील कार्यालयाचे नाव व पत्ते. | सहाय्यक माहिती अधिकारी | जन माहिती अधिकारी | प्रथम अपिलीय प्रधिकारी |
39 | पशु वैद्यकिय अधिकारी श्रेणी -2 | पशुधन पर्यवेक्षक | सहा.पशुधन विकास अधिकारी | गट विकास अधिकारी पंचायत समिती |
40 | अंगणवाडी | अंगणवाडी सेविका | संबंधित पर्यवेक्षिका | बालविकास प्रकल्प अधिकारी, संबंधित प्रकल्प कार्यालय. |