जिल्हा परिषद जळगाव

थोर विभूती/स्वातंत्र्यसेनानी

बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे 

बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे

बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे मराठीतील एक श्रेष्ठ निसर्गकवी होते. यांचा जन्म महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे १३ ऑगस्ट, १८९० रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बापूराव देवराव ठोंबरे होते.आणि आई गोदाताई.ठोंबरे.त्यांचे वडील बापूराव हे पोलीस खात्यात असल्याने वारंवार त्यांच्या बदल्या होत होत्या. त्यामुळे बालकवींच्या शिक्षणात खंड पडत होता. एरंडोल, यावल, जामनेर, धुळे, जळगाव अशा गावी त्यांचे शिक्षण झाले.

निसर्गातच त्यांनी आपले शिक्षण घेतले.त्यांनी आपल्या मोठ्या बहिणीच्या सानिध्यात येऊन काव्याचे वाचन केले .त्यांच्या बहिणीमुळेच त्यांच्यात कवितेचे आवड निर्माण झाली.त्यांनी नाशिकला संस्कृत तर पुण्यात इंग्रजीचे अध्ययन घेतले. सन १९०७ मध्ये जळगाव येथे कान्होबा रणछोडदास कीर्तिकर यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या कविसंमेलनात बालकवींनी वयाच्या सतराव्या वर्षी आपली कविता सादर केली. बालवयातच त्यांनी प्रकट केलेल्या काव्यगुणांचे उपस्थितांनी कौतुक केले या संमेलनातच कान्होबा रणछोडदास कीर्तिकर यांनी त्यांचा बालकवी ही पदवी देऊन गौरव केला. पुढे याच नावाने ते प्रसिद्धीस आले.

त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यावर त्यांची आर्थिक परिस्थिती विकट झाली.थोरल्या आणि धाकट्या भावाचा त्रास त्यांना सहन करावा लागला. त्यांचे लग्न विनायक जोशी यांची कन्या पार्वतीबाई सह झाले.पण त्यांना कौटुंबिक सुख मिळाले नाही. त्यांचे त्यांच्या पत्नीशी जुळले नाही. आणि त्यांचे वैवाहिक जीवन अयशस्वी झाले. त्यांनी आपल्या पोटासाठी वेगवेगळ्या नोकऱ्या केल्या.

मराठी लेखक आणि कवी रेव्हरंड नारायण वामन टिळक यांच्याबरोबर त्यांनी बालपणातील काही काळ घालवला. रेव्हरंड नारायण वामन टिळक. यांनी त्र्यंबकमधील प्रतिभा ओळखून त्यांना आपल्या घरी आणले. त्यांची पत्नी लक्ष्मीबाई टिळक या बालकवींना मुलगा मनात असे. त्यांचे मातृत्वाचे संबंध होते. बालकवी टायफॉईडने आजारी असताना रेव्ह. टिळकांनी व लक्ष्मीबाईंनी अवघे चाळीस दिवस त्यांची काळजी घेतली.


जळगावात पहिले महाराष्ट्र कविसंमेलन झाले. या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. कान्होबा रणछोडदास कीर्तिकर यांनी त्या संमेलनात ठोंबरेंना ‘बालकवी’ ही उपाधी दिली.या कविसंमेलनाने बालकवी साहित्यरसिकांना ज्ञात झाले .

त्यांना निसर्गाची ओढ बालपणापासूनच होती. या वयातच त्यांना राष्ट्रीय कीर्तनकार वनवासी उपाख्य रामचंद्र कृष्ण वैद्य यांचा सहवास लाभला .तर पुण्याच्या वास्तव्यात गोिवदाग्रज, दिवाकर यांचा सहवास लाभला

वनवासींसह बालकवींनी निसर्गाच्या विविध छटा अनुभवल्या.त्यांनी वनवासींच्या कीर्तनासाठी काव्य रचना केली.कमी वयातच वनवासींचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांना घरी परतावे लागले.। निसर्गाच्या सहवासात बालकवींनी जीवनाचे अनेक रंग अनुभवले. या निसर्गातच बालकवी रमले. त्यांनी निसर्गाची मधुर गाणी बालकवी यांनी गेले.

निसर्गविषयक कवितांशी बालकवींच्या जीवनाचा साक्षात संबंध आहे. म्हणूनच त्या भावोत्कट, या अनुषंगाने हृदयस्पर्शी उतरल्या आहेत. बालकवींनी प्रकृतीच्या पर्यवेक्षणात रात्रीमागून रात्र आणि दिवसामागून दिवस घालवले होते..

अर्थात, बालकवींचे सृष्टीचे वर्णन म्हणजे सृष्टीचे केवळ बाह्य चित्र नाही, तर त्यांच्या संस्कारक्षम मनावर तिचे उमटलेले प्रतिबिंब आहे; निसर्गाशी तादात्म्य पावलेल्या कविमनाचे ते सहजोद्गार आहेत. बालकवींच्या कवितेमध्ये निसर्गवर्णनावर विशेष भर आहे. निसर्गामध्ये त्यांना मानवी चैतन्याचा प्रत्यय येतो व त्याचा आविष्कार ते आपल्या काव्यामधून घडविताना दिसून येतात.

त्यांच्या उत्कट, हळव्या व निर्व्याज वृत्तीचा प्रत्ययही त्यांच्या काव्यामधून आपणास येतो. नादमाधुर्य हे त्यांच्या कवितेचे आणखी एक वैशिष्ट्य सांगितले जाते. बालकवींना निसर्गाविषयी वाटणारे प्रेम आणि त्या प्रेमाचा त्यांनी आपल्या काव्यातून घडविलेला अपूर्व आविष्कार यामुळेच त्यांना निसर्गकवी असे म्हटले जाते. ५ मे, १९१८ रोजी त्यांचा जळगावला असताना अपघाती व अकाली मृत्यू झाला. समग्र बालकवी हा त्यांच्या कवितांचा संग्रह प्रसिद्ध आहे.

बालकवींच्या प्रसिद्ध कविता – 

आनंदी आनंद गडे

औदुंबर

फुलराणी

श्रावणमास

त्यांची काही पुस्तके-

* फुलराणी : बालकवींच्या निवडक कविता

* बालकवींच्या निवडक कविता

* बालकवींच्या बालकथा (आत्मकथन)

* बालकवींच्या बालकविता

* बालविहग (कवितासंग्रह, )

* समग्र बालकवी

बहिणाबाई चौधरी

विसाव्या शतकाच्या आरंभीची मराठी कविता अभ्यासताना आपल्याला बहिणाबाई चौधरी या कवयत्रीला विसरून चालणार नाही. आधुनिक मराठी कवितेच्या प्रांतातील बहुतेक सर्वच कवी विद्वान, व्यासंगी होते. पण बहिणाबाई चौधरी ह्या अशिक्षित होत्या. तरीही त्यांनी रचलेले काव्य वाचल्यावर एखादा जाणता, शिकलेला आणि अनुभव घेतलेला कवी असावा असं वाटतं.

बहिणाबाई चौधरी यांचा जन्म महाराष्ट्रातील जळगावपासून 6 कि. मी. अंतरावरील असोदे (जळगाव) गावातील प्रतिष्ठित महाजन घराण्यात 24 ऑगस्ट 1880 रोजी नागपंचमीच्या दिवशी झाला. हे गाव खान्देशातील जळगावपासून 6 किमी अंतरावर आहे. त्यांच्या आईचे नाव भीमाई होते. त्यांना  घमा, घाना आणि गण नावाचे तीन भाऊ आणि अहिल्या, सीता, तुलसा नावाच्या तीन बहिणी होत्या. बहिणाबाईंचा वयाच्या 13 व्या वर्षी (1893) खंडेराव चौधरी यांचा मुलगा नथुजीशी यांच्याशी विवाह झाला. सासरी एकत्र कुटुंबात बहिणाबाईना सर्वांचा स्नेह लाभला. पण अगदी तरुणपणीच त्यांना वैधव्य आले. सुरुवातीचे एकत्र कुटुंब विभक्त झाल्यावर आणि नव-याच्या मृत्युनंतर बहिणाबाईना अतिशय हलाखीच्या परिस्थितीचा सामना करावा लागला. पण त्याही परिस्थितीत त्यांनी आपली एक कन्या काशी आणि दोन पुत्र ओंकार आणि सोपान यांच्यावर चांगले संस्कार घडवले.

घरातील आणि शेतातील कामे करता करता त्यांना काव्य सुचले आणि ते काव्य मराठी कवितेच्या प्रांगणात अजरामर ठरले. मराठी साहित्यात लोकगीतांची परंपरा फार जुनी आहे. पण त्यातही स्त्रीगीतांची आणि ओव्यांची परंपरा नुसतीच जुनी नाही तर अनुभवांनी समृध्द आहे. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला स्त्रियांना सामाजिक जीवनात स्थान नव्हतेच. घराची चौकट आणि अगदीच झाले तर शेत अशा दोनच टप्प्यांत स्त्रियांचे जीवन बांधले गेले होते. अशावेळी माहेरची आठवण, सासरच्यांचे वर्तन आणि वाटयाला आलेले इतर अनुभव व्यक्त करण्याकरता स्त्रियांकडे एकच पर्याय उपलब्ध होता. तो होता काव्याचा. वर्षभरातील सणांना एकत्र जमून परस्परांशी साधला जाणारा संवाद हाच काय तो स्त्रियांच्या जीवनातला विरंगुळा होता. हर्ष, खेद, चीड, संताप अशा भावना व्यक्त होण्याचे काव्य हेच माध्यम होते आणि तेच स्त्रियांनी निवडले. त्यामुळेच मराठीला समृध्द अशी स्त्रीगीतांची आणि ओव्यांची परंपरा लाभली. स्त्रीगीतांची मराठीतील परंपरा समृध्द आहे आणि तिच्या अग्रणी आहेत अंगभूत काव्याचं लेणं लाभलेल्या बहिणाबाई चौधरी.

त्यांच्या संपूर्ण जन्मात निरक्षर राहिल्या, म्हणून त्यांनी गायलेल्या कविता शेजाऱ्यांनी लिहिल्या आणि काही कविता नष्टही झाल्या. मराठी असल्याने त्या लेवा गणबोलीया भाषेत लिहायच्या. त्या अशिक्षित होत्या, पण त्यांच्याकडे काव्यात्मक जीवनाची प्रतिभा होती, ज्यात त्यांचे शेतीचे काम, घरातील कामे, विभक्त झाल्यानंतर मुलीचे आयुष्य हे सर्व आहे. हे सर्व ऐकून त्याचा मुलगा सोपानदेव आणि त्याचा चुलत भाऊ दोघेही जमेल तसे लिहायचे.

बहिणाबाई चौधरी काव्यसंग्रह 

महाराष्ट्रातील कवी सोपानदेव बहिणाबाईंचा मुलगा होता. बहिणाबाईंच्या मृत्यूनंतर सोपानदेव आणि तिचे चुलत भाऊ श्री पितांबर चौधरी या दोघांकडे बहिणाबाईची गनीहस्तलिखित स्वरूपात होती. सोपानदेवाने या कविता आपल्या गुरु आचार्यांना दाखवल्या, गुरु म्हणाले की हे सोने आहे! महाराष्ट्रापासून ते लपवणे हा गुन्हा आहे आणि त्या कविता प्रकाशित करण्याचे वचन दिले.

त्यांची कविता गुरुंनी दिलेल्या वचनानुसार 1952 मध्ये प्रकाशित झाली.धरतीच्या अरशमधी सर्गा (स्वर्ग)बघणाऱ्या बहिणाबाईंना महाराष्ट्रात नवी ओळख मिळाली. या काव्यसंग्रहात त्यांच्या केवळ 35 कविता प्रकाशित झाल्या. त्या कवितांविषयी कोणतीही शंका न बाळगता, ज्या कविता त्यांनी केवळ सहधर्म पाळून लिहिल्या होत्या त्या त्यांच्याबरोबर संपल्या. या सर्व कविता प्रकाशित करण्यात सोपानदेवचे आचार्य यांचे कार्य मोलाचे होते.

बहिणाबाई चौधरी कवितेचे वैशिष्ट्य 

लेवा गणबोली भाषेतील; जीवनातील सुख -दु:ख सोप्या शब्दात व्यक्त करणे. खान्देशातील असोदे हे बहिणाबाईंचे जन्मस्थान आहे. तिथला परिसर, तिथे बोलली जाणारी भाषा त्याच्या कवितांमधून व्यक्त होते. स्वतः शेती केल्यामुळे, त्याला शेती, जमीन, त्याचे सुख -दु: ख, जीवनाची उन्नती, प्राणी, प्राणी, पक्षी, झाडे आणि वनस्पती, निसर्ग या सर्व गोष्टींबद्दल आत्मीयता होती, हे आपण त्याच्या काव्यसंग्रहातून मिळवू शकतो. दिसते.

बहिणाबाईच्या कवितांतून आपल्याला निसर्ग भेटतो, नात्या-नात्यांतील परस्परसंबंध जाणवतो, स्त्रीविषयक दृष्टिकोन जाणवतो, उपदेशाचे देशी बोल जाणवतात, सहजसुंदर विनोदाची खोली जाणवते. त्यांच्या कवितांतून गद्य वाक्प्रयोग, बोली भाषेची नाना सुंदर वळणे, बोलीभाषेतील शब्दांचा अचूक वापर आणि सरलता यांचा मिलाफ जाणवतो. त्यांनी लिहिलेल्या कवितांमधून आपण थेट त्या कवितेतील अनुभूतीशीच जाऊन भिडतो. वेडीवाकडी वळणं न घेता येणारी सहजसुंदर अशी बहिणाबाईची कविता आपल्याला शब्दांतून जाणवते.

बहिणाबाईच्या कवितांतून निसर्ग आपल्याला अनेक रुपांनी भेटतो. वारा, पाऊस, शेतीशी निगडीत निसर्गाची कितीतरी रुपं बहिणाबाईच्या कवितांतून भेटतात. बहिणाबाईचे आयुष्य शेती आणि घर अशा दोन टप्प्यांतले असल्यामुळे निसर्गविषयक काव्य करताना त्यातून आपोआपच आपल्याला शेतीशी संबंधित ब-याच घटनांचे चित्रण जाणवते.

म्हणजेच शेतकरी असा आहे की, जेव्हा तो नांगरासह शेतात जातो, तेव्हा त्याच्या पायावर पादत्राणे (चप्पल) नसतात, पण तो पाय कापत राहतो. असे सूक्ष्म निरीक्षण, स्मरणशक्ती, जीवनातील सुख -दु: खांविषयी, जगण्यातून आलेले तत्त्वज्ञान, ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये आहेत. आला सास, गेला सास, बहिणाबाई चौधरी या मराठी कवयित्री होत्या.

असे शब्द आहेत, जे लोकांची मने जिंकू शकतात. छोट्या, सोप्या शब्दात त्यांनी कोणत्याही मोठ्या पुस्तकाचे आयुष्य वाढवले ​​आहे. बहिणाबाईंच्या कवितांचे भाषांतर फ्रेग्रेन्सेस ऑफ द अर्थया काव्यसंग्रहातून इंग्रजीमध्ये प्रकाशित झाले आहे. अनुवादक ही माधुरी शानभाग आहे.

कवितांचा विषय 

बहिणाबाईंच्या कविता विशेषतः तिच्या मातृभाषेवर अवलंबून आहेत, तिच्या कवितांचा विषय आहे पिहार, जग, शेतीचे साहित्य, तिचे काम इत्यादी कृषी जीवनातील विविध घटना, पोळा, गुढीपाडवा इत्यादी सणांचा समावेश आहे. देव आपल्या जीवनात कसे उपस्थित आहे, सूर्य, वारा, पाणी, आकाश, भगवान श्रीकृष्ण त्यांच्यामध्ये उपस्थित आहेत, अशा प्रकारे ते त्यांच्या कविता मध्ये लिहितात.

अभिप्राय आणि पुनरावलोकन 

बहिणाबाई चौधरी या मराठी साहित्यिक आहेत. जुनाट चमकेलाम आनी नव्यत झलकेलम ऐसे बावनकशीही त्यांची कविता सोन्यासारखी आहे, अशा प्रकारे आचार्य अत्रे यांनी बहिणाबाईंना त्याचा अर्थ दिला आहे.

कविता 

  • अहो खोप्यामाधी खोपा
  • अरे जागतिक जग
  • धरित्रीच्य कुशिमधे
  • कंपन न करता
  • तुमचे मन वाढवा
  • माझी माझी सारसोटी

त्यांच्या कविता विशेषतः माणसाचा जन्म, माणसाचे जीवन आणि त्याचा मृत्यू या विषयावर आधारित आहेत. त्या असेही म्हणते की, माणूस पोट भरण्यासाठी तळमळतो, त्याला अडचणींना कसे सामोरे जावे लागते, हे सर्व त्याने आपल्या कवितेत सांगितले आहे.

स्वामी कुवलयानंद

स्वामी कुवलयानंद : (३० ऑगस्ट १८८३१८ एप्रिल १९६६). एक थोर शारीरिक शिक्षणतज्ज्ञ व योगविद्येचे प्रयोगशील पुरस्कर्ते. पूर्ण नाव जगन्नाथ गणेश गुणे. त्यांचा जन्म गुजरातमधील डभई येथे मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण पुणे आणि पुढील शिक्षण बडोदे येथे झाले. मॅट्रिकनंतर ते लोकमान्य टिळकांच्या स्वराज्य चळवळीत सहभागी झाले. पुढे १९१० मध्ये त्यांनी बी. ए. ही पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी बडोदे येथील माणिकराव यांच्याकडून मल्लविद्येचे व माधवदास महाराज, मालसर यांच्याकडून योगविद्येचे शिक्षण घेतले. साहजिकच त्यांना मल्लविद्या, योग यांचा अभ्यास सर्वत्र व्हावा असे वाटू लागले.

स्वामी यांनी काही वर्षे बडोदे व अमळनेर या ठिकाणी त्यांनी अध्यापन व्यवसाय करून उत्तम शिक्षक म्हणून नावलौकिक मिळविला. तसेच त्यांनी १९१६ मध्ये राष्ट्रीय शिक्षणकार्यास हातभार लावण्याच्या दृष्टीने खानदेश शिक्षण मंडळाची स्थापना करून राष्ट्रीय शिक्षकाचा पेशा पतकरला. अमळनेरलाच स्वतंत्र बाण्याचे राष्ट्रीय शिक्षण देणारे महाविद्यालय स्थापून त्याचे ते १९२३ पर्यंत प्राचार्य होते. त्यानंतर त्यांनी आपले सारे लक्ष शारीरिक शिक्षणाकडे केंद्रित केले. बलसंवर्धन, आरोग्यशिक्षण व व्याधिनिवारण या कामी योगशास्त्राचा सामान्य जनांस कसा उपयोग होईल, याविषयी ते पुढे प्रयोग करू लागले. त्यासाठी त्यांनी १९२४ मध्ये लोणावळा या ठिकाणी कैवल्यधाम (Kaivalyadham) नावाची योगशिक्षण संस्था स्थापन केली. पुढे या संस्थेच्या मुंबई, राजकोट इत्यादी ठिकाणी शाखा निघाल्या. त्यांनी आपल्या विविध प्रयोगांनी भारतेतर देशांचेही लक्ष वेधून घेतले. संस्थेतील प्रयोगांची माहिती व्हावी, म्हणून त्यांनी योगमीमांसा (१९२४) हे इंग्रजी त्रैमासिक काढले व आपले संशोधनपर लेख त्यामधून ते प्रसिद्ध करू लागले. त्यांची ही शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरी पाहून १९२७ मध्ये त्यांस शारीरिक शिक्षण समितीचे सदस्यत्व देण्यात आले. १९३७ ते १९४२ च्या काळात ते समितीचे अध्यक्ष होते. युद्धोत्तर शैक्षणिक पुनर्रचनेचे सदस्यत्वही त्यांस देण्यात आले. त्यांच्या नेतृत्वाखाली १९३८ मध्ये शारीरिक शिक्षण मंडळाची स्थापना झाली आणि नवीन अभ्यासक्रम तयार करण्यात आला. ते महाराष्ट्र शारीरिक शिक्षण मंडळाचे बारा वर्षे अध्यक्ष व केंद्रीय शारीरिक शिक्षण सल्लागार मंडळाचे अखेरपर्यंत सदस्य होते. महाराष्ट्राबाहेरील शारीरिक शिक्षण व व्यायामशिक्षकांचे प्रशिक्षण यांतही त्यांनी मार्गदर्शन केले. आपल्या गुरुजींच्या नावाने श्रीमन माधव योगमंदिर ही संस्था स्थापून भारतात अनेक ठिकाणी योगिक शिक्षणसंशोधनाची सोय केली. तसेच अमेरिका व फ्रान्स येथेही संस्थेच्या शाखा आहेत. उर्वरित आयुष्यात योग आणि योगाभ्यास हाच त्यांचा ध्यास होता.

योगविद्येस अद्‌‌भुततेच्या वलयातून बाहेर काढून स्वामीजींनी योगविद्येला जी वैज्ञानिक बैठक तयार केली, त्यामुळे त्यांचा लौकिक झाला.

स्वामींनी योगासंबंधीचे आपले विचार ग्रंथांद्वारे सिद्ध केले. त्यांची योगासने (१९३१), प्राणायाम (१९६६) आणि योगिक थेरपी  (सहलेखक – १९६३) ही इंग्रजी भाषेतील तीन पुस्तके अत्यंत लोकप्रिय झाली. त्यांनी मराठीमध्ये सुदामदेवचरित्र (१९०४), काव्यरत्‍नावली (१९०४) व कुवलयानंदांची गाणी (१९१७) ही पुस्तके लिहिली. यांशिवाय बृहद्योगियाज्ञवल्क्यस्मृति (१९२९) व गोरक्षशतक (१९५८) हे दोन संस्कृत ग्रंथ संपादित केले. त्यांचे यौगिक संघव्यायाम (१९३६) हे हिंदीतून लिहिलेले पुस्तकही प्रसिद्ध आहे. वरील ग्रंथांव्यतिरिक्त त्यांचे अनेक संशोधनात्मक लेख आणि भाषणे प्रसिद्ध झाली असून योगमीमांसा या इंग्रजी त्रैमासिकाचे १ ते ७ खंड प्रकाशित झाले आहेत.

स्वामीजी यांचे मुंबई येथे वृद्धापकाळाने निधन झाले.

अझीम प्रेमजी

अझीम प्रेमजी यांचे जीवन 

मुंबई येथील मुस्लिम कुटुंबात अझीम प्रेमजी यांचा जन्म झाला. अझीमजींचे वडील हशीम प्रेमजी हे प्रसिद्ध उद्योगपती! Rice King of Burma म्हणून त्यांना ओळखलं जायचं. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात हशीम प्रेमजींनी सुमारे 1945 साली  “Western India Products Limited या कंपनीची सुरुवात केली. या भागात मोठ्या प्रमाणावर भूईमूगाचं उत्पादन होत असल्यामुळे त्यांनी तेल, डालडा इत्यादी वस्तू बनवण्याचा कारखाना सुरू केला. सनफ्लावर वनस्पती म्हणून याठिकाणी घरगुती तेलाचं उत्पादन घेण्यात येत असे. शिवाय ७८७ नावाच्या साबणाचं देखील उत्पादन घेतल्या जाई.

 

 

महान व्यक्तिमत्व आणि प्रसिद्ध उद्योगपती अझीम प्रेमजी यांच्या अल्पपरिचय  

पूर्ण नांव (Name) अझीम हशीम प्रेमजी
जन्म (Birthday) 24 जुलै 1945
पत्नी (Wife Name) यास्मिन प्रेमजी
मुलं (Childrens Name)रिषद आणि तारिक

जळगाव जिल्ह्यात अमळनेर नावचा तालुका आहे. महाराष्ट्रातील एका सर्वसामान्य तालुक्यात सर्वसाधारण जीवन जगणाऱ्या अंमळनेरच्या लोकांचं जीवन एका निर्णयामुळे बदललं. अझीम प्रेमजी यांच्याबद्दल प्रा. बहुगुणे सांगतात, “विप्रोच्या शेअर्समुळे मला खूप फायदा झाला. मी विचारही केला नव्हता, इतका पैसा मी कमवला. विप्रोचे अध्यक्ष अझीम प्रेमजी यांच्या दानशूरपणाच्या बातम्या आम्हाला कळल्यानंतर आम्हालाही असं काम करण्याची प्रेरणा मिळाली. मी निवृत्त झाल्यानंतर लोकमान्य शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य केलं. देशात अनेक श्रीमंत आहेत. पण अझीम प्रेमजी यांच्याइतका उदार अंतःकरणाचा माणूस आतापर्यंत पाहिला नाही.”

पाकिस्तानच्या निर्मितेचे जनक म्हणून ओळखल्या जाणारे मोहम्मद अली जिन्ना यांनी अझीमजींच्या वडिलांना पाकिस्तानात येण्यासाठी आमंत्रित केलं होतं, परंतु हशीम प्रेमजी यांनी ही विनंती फेटाळून भारतात राहणं पसंत केलं. 1966 साली हशीम प्रेमजींच्या निधनाची वार्ता ज्यावेळी अझीमजींना मिळाली त्यावेळी ते स्टेनफर्ड विद्यापीठात इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग या विषयात विदेशात शिक्षण घेत होते. वडिलांच्या निधनामुळे ते भारतात परतले आणि कंपनीची जवाबदारी उचलली.

त्यावेळी ही कंपनी “Western India Products Limited” या नावाने आपली उत्पादनं निर्मिती करत होती, पुढे अझीमजींनी बेकरी फेट्स, लायटिंग प्रोडक्ट, हेयर केयर सोप्स, लहान बाळांसाठी उत्पादनं घेण्यास सुरुवात केली. काळाची पावलं ओळखून अझीम प्रेमजींनी अमेरिकेतील सेंटीने या कंपनीच्या मदतीने मिनी कम्प्युटर निर्मितीत पाऊल ठेवलं.साधारण याच सुमारास त्यांनी आपल्या कंपनीचे नाव बदलून ‘Wipro‘ असं ठेवलं. पुढे त्यांनी माहिती तंत्रज्ञानावर आपलं लक्ष केंद्रित केलं. अझीमप्रेमजी यांचा विवाह यास्मिन यांच्याशी झाला. त्यांना रिषद आणि तारिक ही दोन मुलं आहेत. त्यातील रिषद हे  Wipro मधेच कार्यरत असून आयटी विभागात चीफ स्ट्रेटेजी ऑफिसर म्हणून जवाबदारी सांभाळत आहेत.

अझीम प्रेमजी यांच्याविषयी महत्वपूर्ण माहिती 

अमेरिकी बिजनेस पत्रिका फोर्ब्स नुसार 1999 ते 2005 पर्यंत अझीम प्रेमजी भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती होते. अझीम प्रेमजी हे आयटी कंपनी Wipro Limited चे चेयरमैन आहेत.

आज संपूर्ण देशभर Wipro मधे एक लाख तीस हजार कर्मचारी कार्यरत असून 54 देशांमध्ये कंपनीच्या शाखा आहेत. Wipro ची मुख्य शाखा बैंगलोर येथे आहे.

1966 साली आपल्या वडिलांच्या निधनामुळे अझीम प्रेमजी यांना आपलं शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी त्यांनी आपल्या कुटुंबाची आणि व्यवसायाची जवाबदारी सांभाळली.

अझीम प्रेमजी यांच्या नेतृत्वात Western India Products Limited या तेल आणि साबण बनवणाऱ्या कंपनीने अनेक उत्पादनांमध्ये गरुड भरारी घेतली आणि आयटी क्षेत्रात आपलं विशिष्ट स्थान निर्माण केलं.

त्यांच्या मते गुणवत्ता…निर्मिती…उत्पादनात आपण आंतरराष्ट्रीय मुल्यांकन नजरेसमोर ठेवायला हवे, आणि जोपर्यंत आपण त्या पुढे पोहोचत नाही तोवर थांबायला नको.

अझीम प्रेमजी यांच्या आयुष्यात चढ-उतार कमी नव्हते परंतु त्यांनी कधी हार मानली नाही…आपल्या सहकाऱ्यांवर, कर्मचाऱ्यांवर कायम विश्वास ठेवला… एवढी मोठी कंपनी प्रामाणिकतेच्या बळावर मोठी केली आहे.

अझीम प्रेमजी यांना भारतातील बिल गेट्स देखील म्हंटल्या जातं.

आज अझीम प्रेमजी हे भारतातील श्रीमंत उद्योगपतींमध्ये तिसऱ्या स्थानावर असून संपूर्ण जगातील श्रीमंतांमध्ये ते 41 व्या स्थानावर आहेत.

अझीम प्रेमजी यांनी 2001 साली अझीम प्रेमजी फाउंडेशन या सामाजिक संस्थेची स्थापना केली.

अझीम प्रेमजी यांची सामाजिक संस्था ‘Azim Premji Foundation‘ गरीब आणि अनाथ मुलांना प्राथमिक शिक्षण उपलब्ध करून देण्याकरता अमुल्य योगदान देते आहे.

आजवर अझीम प्रेमजींनी 34% शेयर्स आपल्या फाउंडेशन ला दान केले आहेत. आतापर्यंत त्यांनी समाजकार्यासाठी आपली 67 टक्के संपत्ती म्हणजे 45 लाख करोड दान केले आहेत.

अझीम प्रेमजी यांनी निर्माण केलेल्या कंपनी 

विप्रो लायटिंग व विप्रो जीई मेडिकल सिस्टीम/ Wipro Lighting and Wipro GE Medical Systems -1991

विप्रो नेट/ Wipro Net -1999

नेटक्रेकर/ Netcracker-2000

विप्रो वॉटर/ Wipro water -2008

विप्रो इकोएनर्जी / Wipro EcoEnergy -2009

अझीम प्रेमजी यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान 

2005 साली भारत सरकारनं अझीम प्रेमजी यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलं आहे.

2011 या वर्षी पद्मविभूषण या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आलं.

2000 साली मणिपाल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन ने मानद विद्यावाचस्पती ही पदवी त्यांना बहाल केली.

नशनल इंस्टीट्युट ऑफ इंडस्ट्रीयल इंजिनियरिंग मुंबई यांनी 2006 साली अझीम प्रेमजी यांना बिजनेस व्हिजनरी हा पुरस्कार देऊन गौरव केला.

त्यांच्या सामाजिक कार्याची दाखल घेत मिडलटाउन इथल्या वेसलेयन विद्यापीठाने 2009 साली मानद विद्यावाचस्पती पदवी देवून त्यांचा यथोचित गौरव केला.

2013 मध्ये प्रेमजी यांना  ‘Economic Times‘ जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

2015 साली मैसूर विश्वविद्यालयाने त्यांना डॉक्टरेट या उपाधीने सन्मानित केलं.

बिजनेस वीक मासिकाने Wipro कंपनीला विश्वातील सर्वाधिक वेगाने प्रगती करणारी कंपनी ठरवत अझीम प्रेमजी यांची मोठे उद्योगपती म्हणून दाखल घेतली.

India Today या नामांकित मासिकाने 2017 साली आपल्या यादीत भारतातील प्रभावशाली 50 प्रतिष्ठित व्यक्तीमत्वांत अझीम प्रेमजी 9 व्या स्थानी होते.

2000 साली एशियावीक ने सर्वात शक्तिशाली 20 पुरुषांच्या यादीत अझीम प्रेमजी यांची निवड केली होती.

Times मासिकानं अझीम प्रेमजी यांचा दोन वेळा 100 सर्वाधिक प्रभावी व्यक्तींमध्ये समावेश केला आहे.

अझीम प्रेमजी यांच्याविषयी विशेष गोष्ट म्हणजे Wipro चे चेयरमैन असून देखील त्यांना विमान प्रवासा दरम्यान इकोनॉमी क्लास मधून प्रवास करायला आवडतं.

याशिवाय मोठमोठ्या हॉटेल मधे थांबण्यापेक्षा कंपनीच्या गेस्ट हाउस मधे थांबणं ते जास्त पसंत करतात. अझीम प्रेमजी यांच्यातील परोपकाराचा गुण त्यांना इतर उद्योगपतींपासून वेगळं करतो. त्यांच्यातील सामाजिक जाणीव, दातृत्व यामुळे त्यांनी आपल्या संपत्ती मधील अर्धा वाटा समाजकार्या करता दिला आहे. त्यांनी केलेल्या या कार्यामुळे कित्येक गरजवंत मुलांना आज शिक्षणाच्या प्रवाहात आणणं शक्य झालं आहे…

जिल्हा परिषद, शिवाजी नगर रेल्वे पुलाजवळ, जळगांव-425001, महाराष्ट्र [MS], भारत

सोम. ते शुक्र. स.९.४५ वा. ते संध्या ६.१५ वा.

इ-मेल:
© 2022 ZP Jalgaon. All rights reserved @ Zilha Parishad,Jalgaon.| Designed & Developed by IT Cell, Zilha Parishad,Jalgaon

Proper View - Screen Resolution must be 1024 x 786 in pixel size.