जिल्हा परिषद जळगाव

सर्वसाधारण माहिती

जळगाव हा भारताच्या महाराष्ट्रातील उत्तर भागातील जिल्हा आहे. प्रशासकीय आसन हे जळगाव शहर आहे. त्याची उत्तरेला मध्य प्रदेश राज्याने आणि पूर्वेला बुलढाणा जिल्ह्यांनी, आग्नेयेस जालना, दक्षिणेस औरंगाबाद, नै ऋत्येस नाशिक आणि पश्चिमेस धुळे या जिल्ह्यांची सीमा आहे. जळगावला मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणतात.

सातपुडा पर्वतरांगांनी घेरलेला जळगांव जिल्हा! तापी नदीने वेढलेला जळगांव जिल्हा! शिक्षणाचा ’श’ देखील माहित नसतांना ग्रामीण धाटणीच्या कवितांनी जगभर प्रसिध्द झालेल्या बहिणाबाई चौधरींचा जळगांव जिल्हा! बालकवी ठोंबरेंचा जळगांव जिल्हा! जळगांव जिल्हा बहिणाबाई चैधरींमुळे देखील प्रकाशझोतात आला,त्यांच्या मृत्युपश्चात त्यांच्या मुलाने बहिणाबाई चैधरींच्या अहिराणी भाषेतील कविता प्रकाशीत केल्या आणि अवघेजन अवाक् झाले.

एका अशिक्षीत शेतकरी महिलेने जिवनाचे सार तिच्या कवितांमधुन व्यक्त केले आणि समाजाला विचार करायला भाग पाडले आज उत्तर महाराष्ट्र विद्यापिठ कवियत्री बहीणाबाई चैधरी उत्तर महाराष्ट्र विश्वविद्यालय म्हणुन ओळखले जाते यातच सर्व आले. इतके मोठे व्यक्तीमत्व त्याच्या मृत्युपश्चात नावारूपाला यावे हा केवढा दैवदुर्विला!

जळगांव जिल्हा महाराष्ट्र राज्यात उत्तर पश्चिमेकडे वसलेला जिल्हा असुन सातपुडा पर्वत रांगांनी वेढलेला आहे, याच्या दक्षिणेकडे जवळच जगप्रसिद्ध पर्वत रांगा आणि अजिंठा लेणी आहेत.

कापसाच्या उत्पादनाकरता येथील शेती उपयुक्त असुन चहा, सोने, डाळी, कापुस आणि केळींकरता प्रमुख बाजारपेठ म्हणुन जळगांव ची ओळख आहे.

तापी नदीचे विशाल पात्र डोळयांत मावत नाही, महाराष्ट्रातील इतर नद्यांचा उगम पश्चिम घाटांमघे होतो आणि त्या पुर्वेकडे बंगाल च्या खाडीपर्यंत वाहातात परंतु तापी पुर्वेकडुन पश्चिमेकडे वाहाते आणि पुढे अरबी समुद्राला जाउन मिळते.

जळगांव जिल्हयातील तालुके

जळगांव जिल्हयात एकुण 15 तालुके आहेत.

1. जळगांव9. एरंडोल
2. अमळनेर10. जामनेर
3. भडगांव11. मुक्ताईनगर
4. भुसावळ12. पाचोरा
5. बोदवड13. पारोळा
6. चाळीसगांव 14. रावेर
7. चोपडा15. यावल
8. धरणगांव

वाहतूक

• राष्ट्रीय महामार्ग 161H (भारत) नांदुरा येथून राष्ट्रीय महामार्ग 161G (भारत)
• राष्ट्रीय महामार्ग 161G (भारत) पासून पातूर – बाळापूर – शेगाव – संग्रामपूर – जळगाव जामोद – खाकनार M.P.
• खांडवी – कुऱ्हा मार्गे मुक्ताईनगर रस्ता. राज्य महामार्ग 195 जळगाव जामोदला जोडतो
• MH SH 24 संग्रामपूर – तेल्हारा मार्गे
• नांदुरा – मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील बडनेरा विभाग हे जवळचे रेल्वे स्थानक आहे.
• औरंगाबाद विमानतळ २२३ K.M अंतरावर सर्वात जवळचे देशांतर्गत विमानतळ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर हे सर्वात जवळचे आंतरराष्ट्रीय विमानतळ ३२७ किमी अंतरावर आहे.


भौगोलिक

लोकसंख्या 42,29,917 क्षेत्रफळ 11,765 वर्ग कि.मी. साक्षरता 85ः1000 पुरूषांमागे 933 स्त्रिया राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 आणि 211 या शहरातुन गेले आहेत. या जिल्हयाला पुर्वी खान्देश म्हणुन ओळखल्या जायचे.
या जिल्हयातुन तापी नदी गेली असुन या नदीची एकुण लांबी 724 कि.मी. आहे यातील 208 कि.मी. महाराष्ट्रात आहे. या नदिच्या अनेक उपनद्या असुन या नदीचे पात्र फार मोठे आहे. याशिवागिरणा आणि वाघुर या देखील प्रमुख नद्या आहेत.
अहिराणी ही येथील प्राचीन आणि मुख्य भाषा असुन, मराठी, खानदेशी भाषा देखील येथे मोठया प्रमाणात बोलल्या जातात. मध्यप्रदेश लगतचा समुदाय हिंदी भाषेचा उपयोग करतो.
या जिल्हयात साधारण 700 मि.मी. पाउस पडत असुन उन्हाळयात तापमान 45 ते 48 डिग्री सेल्सीयस पर्यंत देखील पोहोचते, थंडीच्या काळात वातावरण सुखदायक असते.
केळी, गहु, बाजरी, लिंबु, भुईमुग, कापुस आणि उस ही येथील मुख्य पिकं आहेत.पारंपारीक यात्रांमधे कार्तिक महिन्यात राम राठोत्सवाची यात्रा, नवरात्रात महालक्ष्मीची यात्रा, मुक्ताईनगर पासुन 6 कि.मी. दुर चांगदेवाची यात्रा आणि मुक्ताईनगर येथील कोठळीत मुक्ताईची यात्रा पारंपारीक आणि उत्साहाने दरवर्षी साजरी होते.

जिल्हा परिषद, शिवाजी नगर रेल्वे पुलाजवळ, जळगांव-425001, महाराष्ट्र [MS], भारत

सोम. ते शुक्र. स.९.४५ वा. ते संध्या ६.१५ वा.

इ-मेल:
© 2022 ZP Jalgaon. All rights reserved @ Zilha Parishad,Jalgaon.| Designed & Developed by IT Cell, Zilha Parishad,Jalgaon

Proper View - Screen Resolution must be 1024 x 786 in pixel size.