अ.क्र. |
योजनेचे नांव |
उद्देश |
आवश्यक कागदपत्रे |
अधिक माहिती |
1 | खासदार स्थानिक विकास कार्यक्रम | सदरची योजना केंद्र पुरस्कृत योजना आहे. मा. खासदार यांनी सुचविलेली स्थानिक गरजांवर आधारीत कामे हाती घेतली जातात. उदा.रस्ते (योजनेअंतर्गत व योजनेबाहय), पुल, सामाजिक व सांस्कृतीक सभागृह, शाळा कपौंड वॉल, समाजमंदीर, व्यायामशाळा, स्मशानशेड, सार्वजनिक शौचालय, स्वच्छतागृह शाळागृह बांधकामे, ग्रामपंचायत व तलाठी कार्यालय, खुला रंगमंच सार्व. वाचनालय, अंगणवाडया, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र बांधकामे, संरक्षक भिंती, एस.टी पिकअप शेड इत्यादी. सदर कामाचे अंदाजपत्रके जिल्हाधिकारी यांना सादरकेली जातात. जिल्हाधिकारी यांनी प्रशासकिय मान्यता दिल्यानंतर निवीदा कार्यवाही पूर्ण करुन कामे पूर्ण केली जातात. | | डाउनलोड |
2 | महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना | सदरची योजना राज्य पुरस्कृत योजना आहे. या योजनेअंतर्गत आराखडयातील मंजूर नियमित रस्ते व खडीकरण करणे ही कामे प्राधान्याने होतात. स्थानिक मजूरांना रोजगार उपलब्ध करूनदिला जातेा. या योजनेची अंमलबजावणी पंचायत समिती मार्फत केली जाते. तालूका स्तरावर ग्रामसभेने सुचविलेली व पंचायत समितीने शिफारस केलेली कामे एकत्रित जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या मंजूरीने कामे मंजूर केली जातात. या योजनेअंतर्गत नांेदणीकृत मजूरांना मागणी नुसार किमान 100 दिवसांचा रोजगार उपलब्ध करुन दिला जातो.स्मशानभूमी अंगणवाडया, प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा अश्या गावा अंतर्गत व योजनाअंतर्गत व योजनाबाहय रस्त्यांचे मातीकाम, खडीकरण अश्या स्वरुपाची कामे या योजनेमध्ये हाती घेतली जातात.या योजनेअंतर्गत तालुकास्तरावर उपअभियंता यांचेकडून अंदाजपत्रके तयार करुन त्यांना गटविकास अधिकारी यांचेकडून प्रशासकिय मंजूरी दिल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येते. | | डाउनलोड |
3 | आमदार स्थानिक विकास कार्यक्रम | या योजने अंतर्गत मा. आमदार महोदयांनी सुचविलेली स्थानिक गरजांवर आधारीत लहान स्वरुपांची लोकोपयोगी कामे हाती घेतली जातात. उदा. रस्ते (योजनेअंतर्गत व योजनेबाहय), पुल, सामाजिक व सांस्कृतीक सभागृह, शाळा कपौंड वॉल, समाजमंदीर, व्यायामशाळा, स्मशानशेड, सार्वजनिक शौचालय, स्वच्छतागृह, शाळा गृह बांधकामे, ग्रामपंचायत व तलाठी कार्यालय, खुला रंगमंच, सार्व. वाचनालय, अंगणवाडया, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र बांधकामे, संरक्षक भिंती, एस.टी पिकअप शेड इत्यादी. सदर कामांचे अंदाजपत्रक करुन जिल्हाधिकारीयांचेकडे सादर केले जाते. जिल्हाधिकारी यांनी प्रशासकिय मान्यता दिल्यानंतर निवीदा कार्यवाही पूर्ण करुन कामे पूर्ण केली जातात. | | डाउनलोड |
4 | डोंगरी विकास कार्यक्रम | सदरच्या योजने अंतर्गत संबंधीत तालुक्याचे मा.आमदार यांच्या शिफारशीनुसार जिल्हा नियोजन समिती मार्फत कामे मंजूर करणेत येतात.यामध्ये रस्ते (योजनेअंतर्गत व योजनेबाहय), पुल, सामाजिक व सांस्कृतीक सभागृह, शाळा कपौंड वॉल, समाजमंदीर, व्यायामशाळा, स्मशानशेड, सार्वजनिक शौचालय, स्वच्छतागृह शाळा गृह बांधकामे, ग्रामपंचायत व तलाठी कार्यालय, खुला रंगमंच, सार्व. वाचनालय, अंगणवाडया, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र बांधकामे, संरक्षक भिंती, एस.टी पिकअप शेड इत्यादी. सदर कामाचे अंदाजपत्रके जिल्हाधिकारी यांना सादर केली जातात. जिल्हाधिकारी यांनी प्रशासकिय मान्यता दिल्यानंतर निवीदा कार्यवाही पूर्ण करुन कामे पूर्ण केली जातात. | | डाउनलोड |
5 | जि.प. इमारत बांधकाम दुरुस्ती / पुनर्जीविकरण कार्यक्रम | शासकिय इमारत दुरुस्तीची कामे सन 1961 पूर्वी बांधलेल्या व शासनाच्या मालकीच्या असलेल्या तसेच जि.प. स्व.मालकीच्या इमारतींची दुरुस्तीची कामे हाती घेतली जातात.त्यासाठी मंजूर अनुदानाप्रमाणे आराखडा तयार करुन त्याला अधिक्षक अभियंता यांचेकडून जॉब नंबर, मंजूरी प्राप्त झाले नंतर कामे हाती घेतली जातात. | | डाउनलोड |
6 | ३०५४/5054 मार्ग व पूल डी.पी.डी.सी. | शासन निर्णय 3 सप्टेंबर 2016 मधील मार्गदशक सुचना नुसार जिल्हा नियोजन समिती कडील आर्थिक तरतूदीचे मर्यादीत ग्रामीण रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण पुल/मो-या बांधणे इत्यादी कामे हाती घेऊन पुर्ण करणेत येतात. | | डाउनलोड |
7 | पंचायत समिती कार्यालय नविन बांधकामे | या अंतर्गत पंचायत समिती कार्यालय प्रशासकिय इमारतींच्या नवीन बांधकामाकरीता शासन स्तरावर निधी उपलब्धता व प्रशासकिय मान्यतेस्तव प्रस्ताव सादर करण्यात येतात.मंजूरी अंतर्गत सदरची कामे हाती घेऊन बांधकाम पुर्ण करण्यात येते. | | डाउनलोड |
8 | रस्ते दुरुस्ती व देखभाल | जिल्हा परिषद कडेस देखभाल व दुरुस्तीसाठी असलेल्या सर्व रस्त्यांची देखभाल व दुरुस्ती करणे या मध्ये रस्त्यांचे डांबरीकरण, डांबरी पृष्ठभागाचे नूतनीकरण, देखभाल व खडीकरण, खडीच्या पृष्ठभागाचे नुतनीकरण, पूल व मो-यांची दुरुस्ती तसेच रस्त्यावरील खड्डे भरणे इत्यादी कामे या योजनेमार्फत हाती घेण्यात येतात.या कामांसाठी 3054 रस्ते , देखभाल व दुरुस्ती या लेखाशिर्षाखाली कामे ग्रामविकास विभागाकडून मंजरू होवून त्याला अनुदान प्राप्त होते.त्यांचेकडून उपलब्ध होणा-या अनुदानातून दुरुस्ती व देखभालीची कामे हाती घेण्यात येतात. | | डाउनलोड |
9 | आरोग्य विभागाकडील योजना (प्रा.आ. केंद्र/ उपकेंद्र बांधकाम व दुरुस्ती) | जिल्हावार्षिक योजने अंतर्गत आरोग्य विभागाकडील प्राथमिक आरोग्य केंद्र/उपकेंद्र बांधकामे व विस्तारीकरण तसेच कंपौंडवॉल, परिसर सुधारणा, जोडरस्ते, अंतर्गत रस्ते व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र दुरुस्तीची कामे हाती घेतली जातात. अंदाजपत्रके जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद जळगांवयांचेकडे प्रशासकिय मंजूरीसाठी सादर केली जातात.प्रशासकिय मान्यते नंतर निविदा कार्यवाही करुन कामे केली जातात. | | डाउनलोड |
10 | 15 वा वित्त आयोग राज्य स्तर | ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद जळगांव कडून या योजनेतील प्रशासकीय मान्यता प्राप्त कामांअतर्गत ग्रामीण भागातील बांधकाम विकास कामांची कामे या अंतर्गत पुर्ण करण्यात येतात. | | डाउनलोड |
11 | 15 वा वित्त आयोग | 15वा वित्त आयोग योजनेअंतर्गत स्थानिक गरजांवर आधारीत उदा.शाळादुरूस्ती,स्मशान शेड दुरुस्ती, पाखाडया, कॉक्रिट गटारे बांधणे, रस्ता दुरुस्ती इत्यादी कामे केली जातात.जी कामे ग्रामपंचायत व पंचायत समितीच्या मलकीची आहेत व त्यांचेकडे ज्या कामांच्या नोंदी आहेत अशीच कामे हाती घेण्याचे निर्देश आहेत.या योजनेमधील कामे मा. जि.प. सदस्य यांनी सुचविलेली निकषाधिन कामे मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांचेकडून मंजूर केली जातात. | | डाउनलोड |
12 | तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम | क वर्ग तिर्थक्षेत्राचे विकास कामांना प्रशासकीय मान्यता जिल्हा परिषद,ग्रामपंचायत विभागाकडून प्राप्त अंती तसेच ब वर्ग तिर्थक्षेत्रांना शासनस्तर प्रशासकीय मान्यता प्राप्ती अंती बांधकाम विभाग कामे हाती घेऊन करणेत येतात. | | डाउनलोड |
13 | जि.पं. सेस योजना ग्रामीण रस्ते | जिल्हा परिषद सेस या योजनेतुन रस्ते, मो-या, गटारेइत्यादी कामे हाती घेण्यात येतात.या योजनेची कामे जि.प. सदस्य यांनीसुचविलेली कामे मा. सभापती बांधकाम व मा. अध्यक्ष , जिल्हा परिषद यांचेशिफारशीनुसार कामे मंजूर होवुन , अनुदान जिल्हा उत्पन्नामधुन मंजूर होते.रक्कम रुपये 5.00 पर्यंतच्या कामांना तांत्रिक मान्यता उपअभियंता यांजकडूनदेणेत येते.तसेच रुपये 5.00 लक्ष वरिल कामांना मा. कार्यकारी अभियंतायांजकडून तांत्रिक व प्रशासकिय मान्यता देणेत येते. | | डाउनलोड |
14 | पशुसंवर्धन योजना (पशुसंवर्धन दवाखाना बांधकाम) | जिल्हावार्षिक योजना व पशुवैद्यकिय दवाखाने मजबूतीकरण व बळकटीकरण योजनेअंतर्गतनवीन दवाखाने, कंपौड वॉल बांधकामे तसेच दुरुस्तीची कामे हाती घेतली जातात.अंदाजपत्रके जिल्हा पशुसंवर्धनअधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी यांचेकडेप्रशासकिय मंजूरीसाठी सादर केली जातात.प्रशासकिय मान्यते नंतर निविदाकार्यवाही करुन कामे केली जातात. | | डाउनलोड |
15 | गट ब- (रस्त्याचा दर्जा टिकविण्याची/सुधारण्याची कामे) | या कार्यक्रमाला शासनाचे ग्राम विकास विभागाकडून मंजूरी देण्यात येते. रस्तेदुरुस्ती व परिरक्षण कार्यकमा अंतर्गत प्राप्त होणाऱ्या किंमतीचाया गटाअंतर्गत रस्त्यांची विशेष दुरुस्ती/सुधारण, डांबरी नुतनीकरण, खडी नुतनीकरण, रुंदिकरण इत्यादि स्वरुपाचीकामे करण्यात येतात. गट बकार्यक्रम अति.मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेमार्फत शासनास सादर करण्यातयेतो. | | डाउनलोड |
16 | गट क- (विशिष्ठ प्रयोजनाची कामे ) | या कार्यक्रमाला शासनाचे ग्राम विकास विभागाकडून मंजूरी देण्यात येते. अपघात प्रवण क्षेत्राची सुधारणा, अभियांत्रिकीसुधारणा, कमकुवत तसेच मोठ्या पुलांची दुरुस्ती, गावे बारमाही रस्त्यानेजोडण्यासाठी मुरमी रस्त्याचे खडीकरण करणे, गावे बारमाही रस्त्यानेजोडण्यासाठी मोऱ्या व लहान रपट्यांची कामे, व लहान मोऱ्यांची सुधारणाइत्यादि स्वरुपाची कामे करण्यात येतात. | | डाउनलोड |
17 | गट - ड :- अन्य व संकीर्ण | हा कार्यक्रम अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. यांच्या पूर्वसहमतीनंतर कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, बांधकाम विभाग यांच्या स्तरावरमंजूर करण्यात येतो.यामध्ये रस्त्याची देखभाल व दूरुस्ती अंतर्गत गट अ,ब व क मध्येसमाविष्ट नसणाऱ्या प्रकारची कामे घेण्यात येतात. गट ड (अन्य व संकिर्ण)रस्ते दुरुस्ती व परिरक्षण कार्यकमा अंतर्गत प्राप्त होणाऱ्या एकूणनिधीच्या 5 टक्केकिंमतीचा गट ‘ड’ कार्यक्रम करण्यात यावा असे शासननिर्णयामध्ये नमुद आहे. | | डाउनलोड |
18 | आरोग्य विभागाकडील कामे | जिल्हावार्षिक योजने अंतर्गत आरोग्य विभागाकडील प्राथमिक आरोग्य केंद्र/उपकेंद्र बांधकामे व विस्तारीकरण तसेच कंपौंडवॉल, परिसर सुधारणा, जोडरस्ते, अंतर्गत रस्ते व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र दुरुस्तीची कामे हातीघेतली जातात. अंदाजपत्रके जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरीयांचेकडे प्रशासकिय मंजूरीसाठी सादर केली जातात. प्रशासकिय मान्यते नंतर निविदा कार्यवाही करुन कामे केली जातात. | | डाउनलोड |