जिल्हा परिषद जळगाव

शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत बदल !

अमळनेर (जि. जळगाव) : जिल्हा परिषद शिक्षकांच्या (ZP Teachers) जिल्हांतर्गत तसेच आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया ऑनलाइन (online) पद्धतीने सुरू आहे. ७ एप्रिल २०२१ च्या शासन निर्णयानुसार सेवेची परिगणना ३१ मेपर्यंत केली जात होती. मात्र २०१९ च्या बदली प्रक्रियेतील अतिदुर्गम डोंगराळ भागातील कार्यरत शिक्षक हे त्या पदावरील ३ वर्षांचा कालावधी ३१ मे २०२२ पर्यंत पूर्ण करीत नसल्यामुळे त्यांच्यावर २०२२ मध्ये होणाऱ्या बदली प्रक्रियेत अन्याय होत असल्याने यात सुधारणा करावी, अशा स्वरुपाची निवेदने शासनाकडे प्राप्त झालेली होती. या पार्श्वभूमीवर २०२२ मध्ये होणाऱ्या बदल्यांसाठी (Transfer) पदावधीची परिगणना ३१ मे ऐवजी ३० जून २०२२ पर्यंत करण्यास शासन मान्यता देण्यात येत असल्याचा शासन परिपत्रक ग्रामविकास विभागाचे उपसचिव का. गो. वळवी यांनी बुधवारी (ता. ४) जारी केले आहे. (Changes in ZP teacher transfer process Jalgaon Education Sector News)जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या (ZP Primary Primary Teacehrs) जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्या या पूर्वी ऑफलाइन पद्धतीने व्हायच्या. त्यानंतर त्या ऑनलाइन पद्धतीने करण्याबाबतचा निर्णय शासनाने घेतला. ७ एप्रिल २०२१ च्या शासन निर्णयान्वये जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या सामान्यपणे वर्षातून एकदाच १ मे ते ३१ मेपर्यंत करण्यात याव्यात, अशी तरतूद करण्यात आलेली आहे. तथापि, २०१९ मधील बदली प्रक्रिया ही ३१ मे नंतर पूर्ण करण्यात आली होती. त्यामुळे बदली झालेल्या शिक्षकांना १५ जूननंतर शालेयकामी हजर व्हावे लागले.

Previous शेकऱ्यांनो लक्ष द्या : आवश्यकतेप्रमाणे खते उपलब्ध असल्याने अफवांवर विश्वास न ठेवता जादाची खते भरुन ठेवू नये

जिल्हा परिषद, शिवाजी नगर रेल्वे पुलाजवळ, जळगांव-425001, महाराष्ट्र [MS], भारत

सोम. ते शुक्र. स.९.४५ वा. ते संध्या ६.१५ वा.

इ-मेल:
© 2022 ZP Jalgaon. All rights reserved @ Zilha Parishad,Jalgaon.| Designed & Developed by IT Cell, Zilha Parishad,Jalgaon

Proper View - Screen Resolution must be 1024 x 786 in pixel size.