जिल्हा परिषद जळगाव

जिल्हा परिषदेबद्दल संपूर्ण माहिती

आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये पंचायत राज हा एक अभिनव प्रयोग आहे.

बलवंतराय मेहता समितीने (१९५८) ग्रामीण विकासात ग्रामीण जनतेला सहभागी करून घेण्यासाठी त्रिस्तरीय पंचायत राज पध्दतीची शिफारस केलेली आहे. त्यास अनुसरून महाराष्ट्र शासनाने दि. ०१ मे १९६२ रोजी महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ चा कायदा सहमत केला व जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद, गट पातळीवर पंचायत समिती व गाव पातळीवर ग्राम पंचायत अशा रीतीने त्रिस्तरीय पंचायत राज ची स्थापना केली. अशा प्रकारे पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारे महाराष्ट्र राज्य हे देशातील नववे राज्य बनले.

 (महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या कायदा, 1961, नियम 9 (1) अन्वये जिल्हा परिषद पुढील व्यक्तींनी मिळून बनलेली असेल)
 (1) राज्य निवडणुक आयोगातील राजपत्रातील अधिसुचनेद्वारे प्रसिध्दिस दिलेले जिल्हयातील निवडणुक विभागातून प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडुन आलेले परिषद सदस्य (जि.प.प्रादेशिक क्षेत्रातील लोकसंख्येनुसार सदस्यांच्या जागांची संख्या निश्चित केली जाते. )
(2) कलम 10 अन्वये जिल्हयातील सर्व पंचायत समिती सभापती, परिषद सदस्यांचा अधिकार पदाचा कालावधी हा पाच वर्षांचा असेल

जिल्हा परिषद हि भारतातील जिल्हा स्तरावरील स्थानिक सरकारी संस्था आहे. साधारणपणे जिल्हा परिषदेचे कार्यालय हे जिल्हा मुख्यालय येथे असते.

महाराष्ट्र व केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती व सेवा ग्रामीण भागातील सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम जिल्हा परिषद करते.

जिल्हा परिषदेचे मुलभूत कार्य : 
  • ग्रामीण भागात अत्यावश्यक सेवा आणि सुविधा पुरविणे. 
  • शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करून देणे. तसेच शेतीसाठी उपयुक्त सुधारित आणि नवीन तंत्रज्ञानाची माहिती देणे.
  • ग्रामीण भागात शाळा व ग्रंथालये स्थापन करून ती व्यवस्थितपणे चालविणे.
  • ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि रुग्णालये सुरू करणे. तसेच वेळोवेळी साथींचे रोग निवारणासाठी प्रतिबंधक लसींचा कार्यक्रम राबविणे.
  • ग्रामीण भागात अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांसाठी विकास योजनांची अंमलबजावणी करणे. आदिवासी मुलांसाठी आश्रमशाळा चालविणे तसेच आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मोफत वसतिगृह स्थापन करणे.
  • ग्रामीण रोजगार राबविणेसाठी लघुउद्योग सुरु करण्यासाठी उद्योजकांना प्रोत्साहन देणे.
  • ग्रामीण भागात पूल, रस्ते बांधणे व त्यांची देखभाल करणे तसेच इतर सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देणे.
  • रोजगारनिर्मिती करणे.

जि.प. जळगांव अंतर्गत विविध विषय समित्या/जि.प. समित्या

स्थायी समिती जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती 
वित्त समिती बांधकाम समिती 
कृषी समिती पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती 
शिक्षण व क्रिडा समिती आरोग्य समिती 
महिला व बालकल्याण समिती समाज कल्याण समिती 
जळगांव जिल्हा परिषदेची संरचना खालीलप्रमाणे : 

निवडून आलेले सभासद : 

एकूण पंचायत समिती : 

पंचायत समितीचे सभापती : 

सर्व पंचायत समित्यांचे एकूण सदस्य : 

अं.क्र.तालुकाजि. प. सदस्य संख्यापं. स. सदस्य संख्यामहसुली गावेग्रा. पं. ची संख्याग्रा. पं. सदस्य संख्या
१.जळगांव 
२.अमळनेर 
३.भडगांव 
४.भुसावळ 
५.बोदवड 
६.चाळीसगांव 
७.चोपडा 
८.धरणगांव 
९.एरंडोल 
जामनेर 
मुक्ताईनगर 
पाचोरा 
पारोळा 
रावेर 
१०.यावल
एकूण 

जिल्हा परिषद, शिवाजी नगर रेल्वे पुलाजवळ, जळगांव-425001, महाराष्ट्र [MS], भारत

सोम. ते शुक्र. स.९.४५ वा. ते संध्या ६.१५ वा.

इ-मेल:
© 2022 ZP Jalgaon. All rights reserved @ Zilha Parishad,Jalgaon.| Designed & Developed by IT Cell, Zilha Parishad,Jalgaon

Proper View - Screen Resolution must be 1024 x 786 in pixel size.